Skip to main content

७3 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा . सिद्धार्थ स्पोर्ट क्लबचे ग्रामस्थानकडू कौतु ++++l

खोपोली-- (किशोर साळुंके ) ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या गावातील सामाजिक कार्यात नेहेमी सक्रिय समजले जाणारे सिद्धार्थ स्पोर्ट क्लब मंडळ प्रणित विश्वरत्न मित्र मंडळ यांच्या वतीने सिद्धार्थनगर येथील डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. . या शुभ दिनी सिद्धार्थनगर या गावातील गावातील शेकडो विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे , खोपोली शहराचे उपाध्यक्ष अनिल सानप, बहुजन युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके व गावातील सामाजिक कार्यकर्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी , महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे व्येक्तिला स्वतंत्र्य ,हक्क ,कायद्याने बहाल करणारा दिवस असून २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले.डाँ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात भारतातील प्रत्येकाला एकमत देण्याचा अधिकार देवून त्या मताच्या अधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली असल्याचे या कार्यक्रमा प्रसंगी खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी यावेळी आपले विचार मांडत प्रतीवर्षी यादिनी विद्यार्थ्यांंना शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपणार्या व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार्या सिद्धार्थनगर स्पोर्ट क्लब मंडळाच्या सर्व सभासदांचे उपस्थित मान्यवरांकडून भरभरुन कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांकडून यावेळी उपस्थित असणारे नागरीक व लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमात ,रा.काँ.पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, भगवानभाऊ खंडागळे सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय महासभा अध्यक्ष सिद्धार्थनगर ,खोपोली शहराचे बहुजन युथ पँथरचे अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके, शिवसेना नेते अनिल सानप व अन्य मान्यवर होते. वरिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेणारे पंकज मोरे, संजय साळुंके महेश गायकवाड ,गुड्या खाडे, चेतन भुजभळ , या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे माजी प्रभाग तिनचे नगरसेक किशोर पानसरे, मोहोन राँकी प्रा.लि., निलखंट व्हँली सुवर्णा मोरे ,किशोर साळुंके अनिल सानप , आदिंचे वरिल मंडळाच्या वतीने आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त