Skip to main content

*खोपोली – सोमवार दि. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त @चला कृतज्ञ होऊ या ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांना समजून घेऊ या@ या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने केले होते.*

शिक्षणाचे आद्य समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, श्री. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.* *सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सौ. सुमनताई ओसरमल माजी नगराध्यक्ष, विनिता ताई कांबळे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेविका सौ. वैशाली ताई जाधव, सौ. केविना ताई गायकवाड, यशस्वी उद्योजिका सौ. कांचन ताई जाधव, सौ. सुवर्णा ताई मोरे, शिवशाही व्यापारी संघ चे संस्थापक अध्यक्ष श्री. युवराज दाखले, सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल जाधव, अनिल सानब हे होते.* *सदर कार्यक्रमासाठी खोपोली मधील सामाजिक व राजकीय शेत्रात काम करणारे यांच्यासह युवा वर्ग व इतर समाज बांधव उपस्थित होते.* *यावेळी सौ. सुमनताई ओसरमल, सौ. विनिता कांबळे, सौ. केविना ताई गायकवाड यांनी सावित्रीआईंच्या त्या काळातील शिक्षणासाठी चाललेल्या धडपडीच्या आठवणींना उजाळा दिला. व त्यांच्याच मुळे आज स्त्री शिकली, सशक्त झाली, चूल व मूल बाजूला ठेऊन आम्ही नगर सेविका, नगराध्यक्ष ते एक स्त्री थेट ह्या देशाची राष्ट्रपती सुद्धा झाली. आपणही त्यांच्या प्रमाणे शिका संघटित व्हा याच बरोबर त्यांच्या कार्याची महती थोडक्यात विशद केली.* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनीच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दरवाजे उघडून नवी क्रांती उभी केली. त्याचे फलित म्हणून आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसतात त्यांच्या मुळेच आज आम्ही खोपोलीच्या समाजकारणातून राजकारणात आलो व उत्तम रित्या काम केले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले ह्याच स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत असे माजी नगराध्यक्ष सौ. सुमन ताई अवसरमल, माजी उपनगराध्यक्ष सौ. विनिता ताई कांबळे ह्यांनी बोलून दाखवले.* *नगर सेविका केविना ताई गायकवाड ह्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्याच मुळे आज आम्हा सर्वांना काम करण्याची संधी भेटली आहे असे सांगितले.* *कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून आलेल्या शिवकन्या प्रा. कु. श्रद्धा नंदकुमार शेट्ये शिक्षण- M. A. D. Ed.( English Literature ). ह्यांनी आपल्या शैलीत आवाजाने संपूर्ण हॉल दणाणून सोडला. त्यांच्या कार्याबद्दल बोलत असताना वेगवेगळी उदाहरण देऊन त्यांच्या बरोबर जे श्रेष्ठ थोर महापुरुष आहेत ह्यांच्या कार्याला समजून त्यांनी त्यावेळी केलेल्या त्यागाचा, हाल अपेष्टा त्यांच्या स्मृतील उजाळा देण्याचे काम केले. त्यावेळच्या रुढी, परंपरा स्त्री ला मिळणारी वागणूक ह्या सर्वातून त्यावेळेच्या त्यांच्या कार्याचा, त्यागाचा, शिक्षणाच्या प्रचारासाठी याच बरोबर सामाजिक कार्यासाठी त्यांनी केलेला त्याग व धेर्यामुळे आज स्त्रीला समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांच्याच मुळे आज मी व मान्यवर महिला इथे उपस्थित आहोत* *अश्या ह्या थोर समाज सुधारक महापुरुषांचे थोडे तरी अवलोकन करून, अस्मसात करून काम केले पाहिजे हे तरुण वर्गाना वेगवेगळी उदाहरण देऊन सांगितले.* *अनिल सानब, पत्रकार सचिन यादव ह्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यावर उजाळा टाकताना त्यांनी काय परिस्तिथी मध्ये काम केले हे सांगितले. कश्या प्रकारे त्यांच्यावर दगड, धोंडे व शेण फेकून त्यांना त्रास दिला गेला हे सांगितले.* *सचिन यादव ह्यांनी आज पुणे येथील भिडे वाडा येथील पहिली मुलींची शाळा हीची काय अवस्था आहे हे ही आवर्जून सांगितले.* *सह वक्ता कुं. दीक्षा घरत हिने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले ह्यांच्या जन्म गावापासून त्यांचे लग्न अवघ्या 9 वर्षात झाल्या पासून यांच्या कष्ट मय योगदाना मुळेच महिला वर्गाला कसा फायदा झाला हे व त्यांचे कार्य अगदी थोडक्यात मूद्देशिर रित्या मांडले.* *श्री. युवराज दाखले यांनीही अगदी मोलाचे मार्गदर्शन या वेळी केले व समाज प्रलोभनाचे काम आपण सर्व ह्या माध्यमातून करत आहात याच बरोबर खोपोली मधील समस्या, नागरिकांचे हक्क ह्या साठी आपण लढा देत आहात म्हणून आयोजकांचे आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय चे विशेष आभार मांडले व या पुढेही असेच काम करत जा ह्यासाठी शुभेच्छा दिल्या* **या कार्यक्रमा साठी आलेल्या मान्यवरांचे आदरातिथ्य आम्ही खोपोली कर आमचं ठरलंय चे सर्व सदस्य यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोडवे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन करते वेळी महेश काजळे ह्यांनी सुद्धा अश्या ह्या थोर समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले ह्यांचा मृत्यु आज जसा वेश्र्विक महामारी कोरोना विषाणू पासून होत आहे तसेच त्यांचा ही मृत्य प्लगे सारख्या महामारित मदत कार्य करत असताना झाला सांगून शासन दरबारी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या या महान कार्याची लवकरच दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुणे, प्रमुख व सह वक्ता ह्यांच्या बरोबर श्रोतेगण व ज्यांनी कार्यक्रमासाठी हॉल दिला त्या मुस्लिम वेलफेअर कम्युनिटी ह्या सर्वांचे आभार मांडले.* *आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय चे शशी मानकवले, मोहन केदार, ईश्वर कासार, राकेश मीरवणकर, प्रदीप मोरे, अक्षय सपकाळ, विनय साळुंखे, इरफान शेख, मुस्तफा शेख, मुस्कान सय्यद, शिल्पा राक्षे, कांचनताई जाधव, रवींद्र अवथनकर, तोफिक करजीकर, सचिन यादव, अशोक मोरे, सतीश येरुनकर, महेश काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...