खोपोली प्रतिनिधी-- ( किशोर साळुंके )
सहजसेवा फाऊंडेशन सातत्याने सातत्यपूर्ण व समाजास चालना देणारे उपक्रम राबवित असते. लोकसहभागातून समाजकार्य ही संस्थेची ओळख आहे.समाजातील विविध घटकांसाठी कार्यातील एक भाग म्हणून रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड येथून सुरुवात झालेली वीट भट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी सुरू झालेला दर रविवारचा निसर्ग शाळा उपक्रम आता चळवळ होत आहे.समाजातील अनेक दानशूर उपेक्षित घटकांना शिक्षित करण्यासाठी सरसावले आहेत.
दिनांक 02 जानेवारी 2022 रोजी खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते सतिश येरूणकर यांनी सामाजिक बांधिलकी जपून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचा संकल्प पूर्ण केला तर वसंत देशमुख मेमोरिअल स्कूल,खोपोलीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप केले याचवेळी वावोशी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ.प्रदीप नथुराम पाटील यांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली.सामाजिक कार्यकर्ते अशोक ठकेकर,युवा पिढीतील आकाश राजेंद्र फक्के, ज्योती भुजबळ व रामसापीर सेवा मंडळ,खोपोली यांनी शैक्षणिक साहित्यासाठी सहकार्य केले.
वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलच्या वतीने मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी काही खेळांचे सुद्धा आयोजन केले.नकुल देशमुख,इशिका शेलार,जयश्री भागेकर,अखिलेश पाटील व बी.निरंजन यांचे शिक्षकरूपात अमूल्य योगदान लाभत आहे.
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या उपक्रमाचे केलेले कौतुक व भविष्यातील सहकार्याचे मार्गदर्शन हा मैलाचा दगड ठरणार आहे.
आजच्या उपक्रमात अशोक ठकेकर,राजेंद्र फक्के,मोईन शेख,मोहन केदार,आकाश फक्के,रमेश पाटील,नरेश पालांडे,जयेश सुर्वे,सचिन शिंदे,संदेश माने तर वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी तेजस्वी देशमुख,मुख्याध्यापिका आश्विनी वाघुले,अर्चना सागळे,सुप्रिया सोरटे,स्मिता खेडकर यांची उपस्थिती होती.
आपल्या मुलांनीही नोकरी वा व्यवसायातून वेळ काढून समाजाप्रति आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे, यासाठी स्वतः समाजकार्यात अग्रेसर राहून स्वतःचे पुत्र आकाश फक्के यांनाही सामाजिक सेवेत आणून समाजातील युवा पिढी पुढे एक आदर्श ठेवणारे राजेंद्र फक्के यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी बहुमोल सहकार्य देणाऱ्या अझीम कर्जीकर व मा. नगरसेवक नितीन मोरे यांच्या विशेष सहकार्याने उपक्रमास चालना मिळत आहे.
सातत्यपूर्ण चालणाऱ्या या सहज निसर्ग शाळेत मनःपूर्वक योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार सहज सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी व्यक्त केले., तर सहज निसर्ग शाळेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी अजूनही बरेचसे उपक्रम राबविताना सहकार्याची भावना शीळफाटा येथील सामाजिक कार्यकर्ते मोईन शेख यांनी व्यक्त केल्या.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment