खोपोली :(प्रतिनिधी ): संपूर्ण देश भारत कोरोना तथा ओमायक्रोन चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाने खोपोली पोलीस ठाण्याकडून कडक कारवाई सुरु केली असून खोपोली बाजार पेठेत मास्क न वापरणाऱ्यानविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना तसेस ओमायक्रोन चे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त झाल्याने महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध कडक करून शाळांही बंद केल्या आहेत. त्यात मास्क लावणे बंधन कारक केले असून मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार शासकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनाही दिले आहेत.
याच अनुषंगाने दि.9 जानेवारी रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक अस्वर व कर्मचाऱ्यांनी खोपोली बाजार पेठेत मास्क न लावणाऱ्यानविरोधात धडक कारवाई करत अनेक व्यापारी, ग्राहक, पादचारी, वाहन चालक यांच्या कडून दांडात्मक रक्कम वसुल केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment