खोपोली :(प्रतिनिधी ) : खोपोली नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणार्या लक्ष्मीनगर ,शहरातील मुख्यबाजारपेठ ,शास्त्रीनगर,आदोशी, साजगाव ,व आदी ठिकाणी नगरपरिषदेच्या जागेत व मालकिच्या जागेतील चाळी , गाळे, राहात्या इमारती वरिल टेरेसवर बेकायदेशीर वाढीव बांधकामे पालिका प्रशासनाची परवाणगी न घेताच उभी केली जात आहेत.तसेच नगरपरिषदेने नेमून दिलेल्या बांधकाम परवाणगीचे नियम धाब्यावर बसवत बांधकाम परवाणगी , नूसार इमारतीचे बांधकाम करत नसल्याचे दिसून येत आहेत ,
बांधकाम नियम डावलून अधिकारी व वरिल मंडळींच्या संगनमताने शहरातील बेकायदेशीर इमारती उभ्या केल्या जात आहेत..पार्कीग न ठेवणे, सामासीक अंतर न ठेवणे, बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी रोड नसतानाही प्लानमधे रोड दाखवून इमारती उभ्या करणे, बेकायदेशीर रस्त्ते बांधून सदनिका विकून ग्राहकांची फसवणूक करणे अशा पद्धतीने ग्राहकांची सरळसरळ दिशाभूल सूरु असल्याचे चित्र खोपोली शहरात दिसून येत आहे.परिषदेचे अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या खुल्या आर्थिक भ्रष्टाचारामुळे बिल्डर व धनदांडग्यांकडून सूरु असलेले व यापूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामांवर ठोस कारवाई न करता त्यांना अर्थपूर्ण संरक्षण दिले जात आहे.
या बेकायदेशीर बांधकामा विरोधात खोपोली शहरातील आर.टी. आय .कार्यकर्ते , पत्रकार तथा खोपोली शहर बहुजन युध पँथर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी नगरपरिषदेच्या संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करत सातत्याने पाठपूरावा करुनही शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर ठोस कारवाई केली जात नाही .तसेच या अनधिकृत बांधकामांना अनधिकृत बांधकाम शास्ती लावून वाढीव करुन वसुल करुन पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेच्या घरपट्टी विभागाकडे अनेक लेखी तक्रारी देवून सुद्धा तक्रारींकडे घरपट्टी विभागाकडूनही ही अर्थपूर्ण दुर्लक्ष होत अससाल्याचे समजते. पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा लाखो रुपयांचा महसुल बुडवला जात आहे.यामुळे आर्थिक उत्पन्नाच्या नावाखाली खोपोलीकरांवर विविध प्रकारचा मालमत्ता कर लादत आहेत.परंतू अधिकृतपणे घेण्यात येणार्या बांधकाम परवाणगीतून पालिकेला मिळणारे उत्पन्न भरपूर आहे.
वरिल अनधिकृत बांधकाम करणार्यांवर पालिका प्रशासनाचा धाक नसल्यामुळे शहरात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सूरु असून याकडे पालिकेचे अर्थपूर्ण संरक्षण असल्याचे समजते .त्यामुळे अनधिकृत बांधकाम व इतर परवाणण्यांमधून मिळणारे मिळणारा लाखो करोडो रुपयांचा महसुल अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे मात्र बुडत असून पालिकेचे प्रचंड आर्थिक नूकसान होत आहे.पालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेला नगररचनाकार विभगाकडून बेकायदेशीर बांधकामाकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे.शहरातील अशा अनेक बिल्डर व धनदांडग्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात आर.टी. आय कार्यकर्ते तथा खोपोली शहर बहुजन युथ पँथरचे अध्यक्ष किशोर साळुंके यांनी शहरातील धनदांडग्यांकडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकामे व शहरात बिल्डरांकडून सूरु असलेल्या गृहप्रकल्पामधे सूरु असलेले बेकायदेशीर बांधकामे करुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी जनहितार्थरित्या निडरपणे समोर येवून पालिकेच्या नगररचनाकार विभागाकडे वारंवार लेखी तक्रार करुनही या बांधकामांवर कारवाई केली जात नाही. लेखी तक्रारी नूसार करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहीती अधिकारातून माहीती मागविण्यात आली असता आमच्याकडून कोणतीही कारवाई केली नसल्याबाबत लेखी माहिती दिली जात आहे. कारवाई न केल्याबाबत बिनदिक्कतपणे लेखी माहीती देणार्या नगररचनाकार विभागातील अधिकारी शहरातील बिल्डर , धनदांडग्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालतात कि काय ? संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतोय कि काय ? असा संशय तक्रारदारांना येत असून .
तेव्हा खोपोली नगरपरिषदेचे अभ्यासू, कर्तव्यदक्ष समजले जाणारे नवनिर्वाचीत मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी वरिल गंभीर बाब लक्षात घेवून वरिल बेकायदेशीर बांधकामंवर त्वरित कायदेशीर कारवाई करुन कर्तव्यात कसूर करत वरिल बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणार्या तसेच तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा करणार्या नगररचनाकार अधिकारी भाग्यश्री भांडालकर याच शहरातील बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामांना सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व चौकशी अंती दोशी आढळल्यास त्यांचे निलंबन करावे अशी मागणी आर. टी आय . कार्यकर्ते तथा खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली केली असून कारवाई न झाल्यास बहुजन युथ पँथरच्या वतीने डाँ. २६ जानेवारी रोजी खोपोली नगरपरिषदेच्या गेट समोर उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.याला जबाबदार प्रशासन असेल.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment