Skip to main content

खोपोली - नगर परिषदेतील अनागोंदी कारभाराविरोधात किशोर साळुंके यांचा उपोषणाचा इशारा ... * अनाधिकृत बांधकाम / वाढीव बांधकाम व भाडेकरु घरपट्टीबाबत अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ..

-खोपोली प्रतिनिधी - खोपोली नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, भाडेतत्वावरिल गाळे,माँल, बिल्डरांनी भाडेतत्वावरिल देलेल्या इमारती,ए.टी.एम,बँका,दवाखाने ,पतपेढ्या, ढाबे, शोरुमची दूकाने ,गोडाउन आदींना वाढीव घरपट्टी तसेच बंगले, इमारती , दूकानांच्या गाळ्यांवर करण्यात आलेले अनाधिकृत बांधकामे , अनाधिकृत बांधकामांना शास्ती लावणे व शहरात सूरु असलेल्या अनेक इमारती या शासनाचे नियम धाब्यावर बसवत असून ग्राहकांची दिशाभूल करणार्या बेकायदेशीर बांधकामांबाबत नगरपरिषदेत वारंवार तक्रार अर्ज करुनही खोपोली नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी पत्रकार , आर,टी. आय कार्यकर्ते तथा बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी २६ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या गेटसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. खोपोली नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर ,बाजारपेठ , आदोशी , शास्त्रीनगर , शिळफाटा , मोगलवाडी अशा विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतव बांधकामे करण्यात आली आहे.वरिल ठिकाणी नगरपरिषदेचे परवाणगी न घेताच मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामे केली आहेत.काही ठिकाणी तर सरकारी जागेतही बांधकामे केल्याचे पहावयास मिळते.तसेच शहरातील बाजारपेठ, शिळफाटा फाटा येथील बाजारपेठेत , शास्त्रीनगर व अन्य ठिकाणी व्यापार्यांनी लोडबेरींग व आपल्या दुकानाच्या वरती बेकायदेशीर गाळे बांधून भाडेकरु तत्त्वावर अनेकांनी आपली मालमत्ता दिली आहे..परंतू त्यांना भाडेकरु तत्त्वावरिल वाढीव घरपट्टी लावण्यात आली नाही.काही बिल्डरांनी शहरातील अनेक भागात आपल्या इमारतींमधे पार्कीगच्या जागेत गाळे अथवा फ्लँट तयार करुन खोपोली नगरपरिषदेची फसवणूक केली आहे. बांधकाम नियमानुसार , मंजूर नकाशा नुसार बांधकाम न करता बेकायदेशीर बांधकामे करत असल्यामुळे अशा इमारतींमधे घर घेणार्यांची फसवणूक होवू नये यासाठी व या सर्व गंभीर प्रकरणांबाबत माहीती अधिकारी कार्यकर्ते तथा युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके खोपोली नगरपरिषदेतील संबंधित खात्यातील अधिकार्यांकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार करुन सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे.यातून खोपोली नगरपरिषदेचा आर्थिक फायदा होवून वार्षीक उत्पन्न वाढणार आहे.परंतू संबंधित अधिकार्यांनी या सर्व पत्रांना केराची टोपली टोपली दाखवत कारवाई केली नसल्याचे पहावयास मिळते.संबंधित अधिकार्याचे आर्थिक हितसंबंध असल्यानेच कारवाई करत नसल्याची शंका किशोर साळुंके यांनी व्येक्त केली आहे. त्यामुळे या सर्व समस्या नगरपरिषदेने त्वरित सोडवून कामात कसूर करत पालिकेचा महसुल बुडविणार्या व बिल्डरांना पाठीशी घालणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करुन त्यांना निलंबन करणे बाबत बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी २६ जानेवारी रोजी खोपोली नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता उपोषण करणे बाबतचे लेखी निवेदन खोपोली नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश साळवे यांना दिले असून सदर उपोषणास खोपोली शहरातील विविध संघटनांनी जाहीर पाठींबा दिला असून सदर अधिकारी निलंबीत झालेच पाहीजेत सर्वजन ठाम आहेत ..

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त