खोपोली - संदीप ओव्हाळ
कोरोनाचा संसर्ग ओसरत असलातरी रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी सर्व सेवाभावी संघटना रक्तदान शिबीर आयोजित करीत असतानाही खोपोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस सागर पवार यांच्या वाढदिसानिमित्ताने मित्र मंडळाच्या वतीने सह्याद्री विद्यायलात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडीक,राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, शिवसेना उप शहर प्रमुख छगन राठोड, रामू पवार, माजी नगरसेवक संजय पाटिल, सुनिल शिंदे, सुशांत म्हामुणकर, समाधान पवार, संदीप गाडे, दिनेश ओसवाल, शब्बीर पटेल, प्रविण महाडिक, लाखन पवार, विशाल चव्हाण, पप्पु जाधव, संतोष मोहिते, परोशन साळुंके, सागर मोहिते यांच्यासह शिळफाटा येथील तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना महारीच्या काळात खोपोलीत सागर पवार मित्र मंडळाने आयोजित केलेला रक्तदान शिबीर चांगला उपक्रम असल्याची प्रतिक्रीया युवा नेते प्रमोद महाडीक यांनी दिली आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment