खोपोली प्रतिनिधी-- ( किशोर साळुंके ) जिल्हाधिकारी रायगड यांनी केले संस्थेच्या कार्याचे कौतुक आणि केले सहकार्य.
गेली अनेक वर्षे आपत्कालीन परिस्थितीत आणि अनेक जोखमीच्या प्रसंगात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून दिल्या गेलेल्या योगदानाची दखल मा. रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून घेतली गेलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये योगदान देताना आवश्यक असलेली उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणारी उपकरणे आणि साहित्य दिनांक 3 जाने, 2022 रोजी मा. महेंद्र कल्याणकर - जिल्हाधिकारी रायगड यांच्या हस्ते, मा. सागर पाठक - रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, मा. पद्मश्री बैनाडे - निवासी उपजिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी राजन जगताप यांच्या उपस्थितीत आमच्या संस्थेला उपलब्ध करून दिले आहे, त्यामधे दहा आसनी रबरी बोट, बोटीसाठीचे इंजिन, लाईफ जॅकेट्स, स्ट्रेचरस् ई. साहित्याचा समावेश आहे. संस्थेचा वतीने गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, महेश सानप, हनीफ कर्जीकर, भक्ती साठेलकर, हरेश सानप हे उपस्थित होते.
येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास सातत्याने मदत करण्याच्या हेतूने अजूनही काही साहित्य देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आम्हाला अभिमान वाटतो की, रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागात आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आमच्या संस्थेच्या कामगिरीचे कौतुक आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम या निमित्ताने झालेले असे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी प्रतीपादन केले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment