कर्जत - प्रतिनिधी-- कर्जत तालुक्यातील सालवड येथे एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबध ठेवून फसवणूक केल्यानंतर त्या पिडीत महिलेला न्याय देण्यासाठी सर्वसामांन्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारी बहुजन युथ पँथर मैदानात उतरून फसवणूक करणार्या इसमाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या सालवड येथील महिले बरोबर एका इसमाने लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबध ठेवले .परंतू कालांतराने वरिल इसम पलटला व लग्न न करता त्या महिलेची फसवणूक करत असल्याचे सदर पिडीत महिलेच्या लक्षात येताच त्या पिडीत महिलेने बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांच्याकडे दाद मागितली आणि त्यांनी आपल्या सहकार्यांसह तात्काळ कर्जत पोलीस ठाणे जावून रात्रभर कायदेशीर प्रक्रिया करत करत सदर फसवणूक कराणार्या इसमाविरोधात ३७६, ४२०, ३४ , अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला सदर पिडीत महीलेला न्याय देण्यासाठी बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिलभाई जाधव , यांच्यासह खालापूर तालुका सरचिटणीस सुरज केदारी, चौक शहर अध्यक्ष निलेश मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष आनंद जगताप ,चौक शहराध्यक्ष रोहीत पवार ,नागेश कांबळे व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment