Skip to main content

*क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी साप्ताहिक पत्री सरकार चा वर्धापन दिन संपन्न*

खोपोली :(रोहिदास वाणी ):रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार चा १७ वा वर्धापन दिन क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी जनता विद्यालय प्राथमिक शाळा येथे जल्लोषात साजरा झाला. रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, राजकीय, वैयक्तिक, सरकारी, न्यायालयीन अशा विविध स्तरावरील विषयांवर भाष्य करणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार यांस नविन वर्षात १७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने संपादक सचिन यादव यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत विविध विषय दिले असताना शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेत हि निबंध स्पर्धा यशस्वी पार पडली. मान्यवर शिक्षकांनी यथा योग्य असे परीक्षण करून त्यात विजयी विद्यार्थी निवडले. यात माध्यमिक शाळेतील विजयी विद्यार्थी होते आदित्य धनाजी थिटे (प्रथम क्रमांक ), ऋतुजा संतोष पाटिल(द्वितीय क्रमांक ), अस्मिता गणेश साठे (तृतीय क्रमांक )तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सन्मिष संतोष गायकर (प्रथम क्रमांक ), स्वरूपा भारत आढे (द्वितीय क्रमांक ), प्रतीक्षा राम जाधव (तृतीय क्रमांक )या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी जनता विद्यालय प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत केदारी, शिव सेना युवा नेते अनिल सानप, भाजप युवा नेते राहुल जाधव, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव बाबर, बहुजन युथ पॅन्थर खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके, सामाजिक कार्यकर्ते गणेश साळुंके,महेश काजळे,पत्रकार प्रशांत गोपाळे, प्रविण जाधव, आकाश जाधव, तय्यब खान, समाधान दिसले, अभिजित दरेकर, प्रविण कोल्हे, रोहिदास वाणी,मनोहर कांबळे, अमोल वाघमारे मुख्याध्यापक म्हात्रे सर, पाटिल सर, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व बक्षीस पात्र विद्यार्थी उपस्थित होते.तसेच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, जनता विद्यालय प्राथमिक व माध्यमिक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

खोपोली - (किशोर साळुंके ) रायगड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे अधिकारी तथा खोपोली नगरिचे सुपुत्र राजेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला रायगड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश पाटील यांचा वाढदिवस १४ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी रायगड , खालापूर व खोपोली शहरातील सर्व मित्र परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पोलीस सहकारी मित्रांनीही राजेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.सदर प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी युवा नेते प्रसाद वाडकर ,माजी.नगरसेवक संजय पाटील, पत्रकार तथा बहुजन युथ पँथर संघटनेचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके ,युवा नेते प्रमोद महाडीक ,पत्रकार सचिन यादव यावेळी उपस्थितीत होते.