पिंपरी चिंचवड प्रतिनिधी-- साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत वगळल्यामुळे भारतरत्न डॉ.पिंपरी चिंचवड मातंग समजामध्ये तिव्र संतापाची लाट पसरली असून पिंपरी चिंचवड येथील डाँ. बाबासाहेब आज केंद्र सरकार विरोधात आज दि. ८ जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले असून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने सूरु झाली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज *पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.* यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतात . त्यांचे म्हणणे असे आहे की, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले गेले नाही.आण्णा भाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीमध्ये नाव नाव जैसे थे न ठेवल्यास रस्यावर उतरुन अंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब अडागळे व शिवशाही व्यापरी संघाचे संस्थापक ,अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे
अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी, प्रयत्नवादी, वास्तववादी विचाराचे लोकशाहीर, साहित्यीक, कामगार नेता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व होते. अण्णाभाऊंनी असे लिहून ठेवले आहे की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कमगाराच्या श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे. म्हणून या मनूवादी संचालकाने अण्णाभाऊचे नाव घेण्याचे नाकारले असावे. म्हणून या संचालकाचा व सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करीत आहोत. या मंत्रालयाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत सामाविष्ठ करावे, ही मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
*या आंदोलनात सर्वश्री मातंग समाजाचे जेष्ट नेते भाऊसाहेब अडागळे, ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय ससाने, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, महाराष्ट्र दलित युवक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मारूती दाखले, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा अध्यक्ष सतिष भवाळ ,भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे, मा. अध्यक्ष युवा नेते नाना कसबे, भारतीय लहुजी पॅंथर संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे*
गणेश आडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाऊ आल्हाट, आबा भवाळ, हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे, नितीन घोलप, मीना कांबळे, मालन गायकवाड, नंदा कांबळे, अक्षय दुनघव, आकाश शिंदे, प्रा. बी, बी. शिंदे, दुराजी शिंदे, उमेश हानवते, विट्ठल शिंदे, कल्पना कांबळे, चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, छबु कांबळे, दशरथ कांबळे, कैलास कसबे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment