Skip to main content

रेल्वे-मस्को गेट ते सुभाषनगर ५० वर्ष जुन्या पुर्वपार रस्त्यास स्वर्गीय सखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करण्यास सुभाष नगर ग्रामस्थांची आग्रही मागणी. ग्रामस्थांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट .

खोपोली : (प्रतिनिधी ) : सुभाष नगर ग्रामस्थ गेले दोन वर्ष रस्त्या साठी संघर्ष करीत आहॆ. खोपोली नगरपरिषदेने सुभाष नगर ग्रामस्थ व महिंद्र कंपनीनी कुठलेही मागणी नसतांना नवीन पर्यायी रास्ता वासरंग ठाकूरवाडी, अय्यप्पा मंदिर, सुभाष नगर ते जे. सी. एम. स्कूल चा कमाल सुरबत केली होती. ११ डिसेंबर रोजी सुभाष नगर खोपोली येथील ग्रामस्थांनी ५० वर्ष जुना रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाष नगर ( जाधव मामांचा घरा परियांत) रास्ता काम स्वरूपी जाण्या येण्यासाठी असावा नवी पर्यायी रास्ता नको याचे निवेदन तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन नगरपरिषदे मध्ये भेटून दिले होते. ग्रामस्थांची आक्रमकता बघत नगर परिषदेने सदर नवीन रस्त्याचे काम ताबडतोब थांबवले. सुभाष नगर ग्रामस्थानी नगर परिषदे कडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. 1. नवीन पर्यायी रास्ता नको 50 वर्ष जुना रास्ता कायम असावा. 2- सदर 50 वर्षे जुना रास्ता खराब झाला आहे त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. 3. या रस्त्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व त्यांच्या घरा समोरील चौकस जाधव मामा चौक असे नामकरण व परिसर सुशोभीकरण करणे. नवीन रस्ता आड मार्गी असल्यामुळे शाळा, कॉलेज, कामावर जाणाऱ्या माता भगिनींना सकाळी जाताना संध्याकाळी व रात्री येताना अडचणीचा होणार होता. या रस्त्यावरून येणाऱ्या रिक्षाचे भाडे येथे राहणार कामगार वर्गाला न परवडणारे आहॆ. खोपोली नगरपरिषदेच्या दिनांक 30 डिसेंबर 2019 च्या सर्वांसाधरण सभेत ठराव क्रमांक 104 मध्ये विषय क्रमांक 13 हा जुना पूर्वापार रास्ता सार्वजनिक रास्ता म्हणून घोषित करण्या करीता सर्वानुमते मजुरी दिली आहे. डांबरीकरणाच्या मागणीचा विचारकर्ता नगर परिषदेने 12 एप्रिल 2021 रोजी डांबरीकरण कमला सुरवात केली पण त्या मध्ये मस्को रेक्रीशन क्लब ते स्वामी अय्यप्पा मंदिर आणि G5 बिल्डिंग ते सहयाद्रेश्वर मंदिरे ह्या रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे आता पुन्हा पहाटे, सकाळी, संध्याकाळी रात्री लोक वॉकिंग आणि जॉगिंगची रेलचेल वाढली आहॆ. रस्त्याचे आणि चौकाचे नामकरण त्या परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या मागणीचे पत्र सुभाष नगर ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, नियोजन सभापती यांना 21 डिसेंबर 2019 रोजी दिले होते. या संघर्भातले पाहिले स्मरण पत्र 13 फेब्रुवारी 2020 रोजी व दुसरे स्मरण पत्र 18 मार्च 2020 रोजी भेट घेऊन दिले होते. त्यानंतरचा कालावधी कोरोना (कोविड 19 च्या) महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले. सरकारनी लागू केलेल्या कोविड नियमामुळे ग्रामस्थांना नगरपरिषदेच्या प्रशासनाची भेट घेता आली नाही. खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. सखाराम गेणु जाधव याच प्रभागातून (सुभाष नगर, मस्को कॉलनी/ जगदिश नगर, वासरंग, लौजी) सलग तीन वेळा निवडून येत हॅट्रिक केली. १९८५ साली जेव्हे ते निवडून आले त्या वेळी या गावात वीज पुरवठा देखील नव्हता त्यांनी ५६ विधुत पोल टाकून नवी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून ते काम पहिली करून घेतले. या मुळेच आज परियांतचा विद्युत रोषणाईचा लख लखाट आपण सुभाष नगर मध्ये पाहत आहात. नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण सभापती, नियोजन सभापती, परिवहन सभापती, मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती अनेक वर्षे स्थाही समितीचे सदस्य अशी पदे भूषवली होती. या माध्यमातून त्यांनी फक्त सुभाष नगर करीत नाही तर संपूर्ण खोपोलो शहरा मध्ये कामे केली. उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती असताना शासकीय जागे मध्ये (आताचे संत निरांकरी हॉल बॉम्बे ऑक्सिजन कॉर्नर वासरंग ) बोरवेल मारून ते पाणी सायद्धेश्वर मंदिर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याचा टाकी परियांत नेण्यात आले तिथून ते पाणी गावात प्रत्येक घरात पोचले. आज जो सुभाष नगरला मुबलक पाणी पुरवठा होत आहे हे त्यांचा दूरदृष्टी नियोजनामुळे आज शक्य झाले आहे. गावात त्या वेळी चालण्यासाठी रस्ते, फुटपाथ, स्ट्रीट लाईट, गटारे कुठलीही नागरी सुविधा नव्हती ही सर्वे कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केली. डोंगर भाग असल्या मुळे पावसाळ्यात मोठ मोठ्या धबधब्याचे पाणी येत आहे त्यांचे हे सुनियोजन त्यांनी केले आहे. मस्को (महिंद्रा ) कंपनी स्टाफ मध्ये काम करीत असल्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य व सुविधा कंपनीच्या डेव्हलपमेंट लागत होत्या त्यांनी करून दिल्या. मस्को कॉलनी (जगदीश नगर) या कामगार वसाहती मध्ये सुद्धा राहिवाशांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या, तेथील कामगारांन करिता, जे. सी. एम. एम. स्कूल व कॉलेजचा व विध्यार्थ्यांसाठी सिटी बस त्यांनी सुरू केली. आमचा सुभाष नगर या गावाच्या जडण घडणेत व गावाला नावारूपास आणण्या करीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. १ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. खोपोली शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, १५ वर्ष नगरसेवक व ज्येष्ठ नेते असलेल्या आमचा गावातील या व्यक्तिीच्या नावाचा सन्मान म्हणून या रस्त्यास स्वर्गीय श्री. सखाराम गेणू जाधव मार्ग, त्यांचा घरासमोरील रस्त्याचा चौकास जाधव मामा चौक असे नामकरण करून त्या परिसराची सुशोभीकरण करण्यात यावे अशी सर्व सुभाष नगर मधील सर्व ग्रामस्थ खोपोली नगर परिषदे कडे मागणी आणि विनंती पुन्हा सर्व ग्रामस्थचा वतीने करण्यात आले. या सर्व संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन रस्त्याचा संघर्ष संदर्भात चर्चा सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव, फरीद शेख, किशोर पुजारी, समीर गायकवाड यांनी केली. या वेळी के. के. कांबळे, गोपाळ बावस्कर उपस्तीत होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...