संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध करुन देण्याबाबत शिवशाही व्यापारी संघाची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी..
खोपोली -( किशोर साळुंके )
खोपोली शहरामधे चर्मकार समाज सुमारे एक हजारांपेक्षा अधिक असून व समस्त बहुजन समाज २० ते २५ हजारांच्या लोकसंख्येत आहेत.अखंड बाराबलूतेदार बहुजन बांधवांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती सुधरण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार असून वरिल बहुजन समाज्याच्या हितासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणारी १५ गुंठे सरकारी जागा नाममात्र भाडे आकारुन संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत खोपोली शहरातीत सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी सदैव कटिबद्ध समजली जाणारी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने खोपोली नगरपरिषदे मुख्याधिकारी दुरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली अहे. मुख्याधिकारी दुरे यांना निवेदन देताना शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक / अध्यक्ष युवराज दाखले , खोपोली शहराचे कार्याध्यक्ष तौफिक करजीकर , खोपोली शहराचे उपाध्यक्ष निलेश रंगिले ,प्रदेश अपाध्यक्ष रोहीदास जाधव , सदस्य बाबुराव मोरे आदी निवेदन देताना उपस्थित होते.
Comments
Post a Comment