खोपोली- (किशोर साळुंके )
शिवजजन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सिद्धार्थनर मधील शिवभक्तांनीही शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.सिद्धार्थनर मधे जागे अभावी गेले अनेक वर्ष सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जात नव्हती..सिद्धार्थनर मधील तिन ते चार गुंठे असलेल्या मोकळ्या जागेत एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अतिक्रमण करुन या जागेवर ताबा घेतला होता .अतिक्रमण झालेली जागा गावातील नागरिकांच्या उपयोगात यावी यासाठी सिद्धार्थनर मधील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किशोर साळुंके , सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊ खंडागळे, खोपोली शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सुवर्णा मोरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बंटी मोरे, सामाजिक कार्यकर्ते तिप्पन्ना आरमान, प्रमोद खाडे, सविता गायकवाड , उषा खंडागळे, यांनी आपला महत्वपूर्ण वेळ देत व स्वताच्या खिशाला झळ देत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व पालिका कार्यालयात सतत पाठपूरावा करुन या कामी दोन वेळा उपोषणाचे हत्यार उपसून वरिल जागा गावकिच्या ताब्यात देण्यात आली. वरिल संघर्ष करताना सामाजिक कार्यकर्ते किशोर साळुंके यांच्या विरोधात अतिक्रमण करणार्या राजकीय पक्षाच्या एका बारीक नेत्याने पोलीसात खोटी तक्रार दाखल करुन गुन्हा दाखलही करण्यात आला होता. अशा संघर्षातून मिळविलेल्या जागेत, सिद्धार्थनर मधील सर्व जातीधर्मिय शिवप्रेमी एकत्र येवून शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला. सिद्धार्थनर मधील प्रशांत खाडे व दिपीका खाडे या नवदांपत्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्य हस्ते पुष्पहार आर्पण करुन पुजा करण्यात आली. .सदर मोकळ्या जागेच्या शुशोभीकरणासाठी प्रभाग तिन चे कार्यसम्राट समजले जाणारे माजी नगरसेवक किशोरभाई पानसरे यांच्या प्रयत्नातून तिन लाख रुपये निधी मंजूर करुन दिल्याबद्दल पानसरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले तर या निधीतून ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले असून .या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी माजी नगराध्यक्षा सुमन औसरमल , नगरसेवक माजी .किशोर पानसरे, माजी नगरसेवक मोहन औसरमल व खोपोली नगरपरिषदेचे तात्कालिन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना निधी साठी शिफारस करत निधीसाठी पाठपूरावा करुन दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आमदार थोरवे , व वरिल नगरसेवक , नगराध्यक्षांचे यावेळी सिद्धार्थनर ग्रामस्थांनी आभार मानले..प्रभाग तिनचे माजी नगरसेवक किशोरजीभाई पानसरे , जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अलिबाग संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक दिपक खाडेसर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना विशद केल्या.शिवजजन्मोत्सव साजरा करण्यासाठी सिद्धार्थनर नगर मधील शिवप्रेमी मोठ्या संखेत उपस्थितीत होते. खोपोली शहराचे बहुजन युथ पँथर अध्यक्ष किशोर साळुंके व सा. पत्रीसरकारचे संपादक साचिन यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पण करुन मानवंदना देण्यात आल्या.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment