Skip to main content

वंचित बहुजन आघाडी व वंचित युवा आघाडी भा.बौ.महासभा विहारी शाखा , नालंदा युवा मंडळ व सुजाता महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.. शिवजजन्मोत्सवाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन ..

.. वतिने खोपोली -( किशोर साळुंके ) खोपोली शहरातील विहारी गावातील वंचित बहुजन आघाडी व वंचित युवा आघाडी शाखेच्या व भा.बौ.महासभा विहारी शाखा नालंदा युवा मंडळ , सुजाता महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विहारी गावातील नालंदा बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजजन्मोत्सवा निमित्त सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड सेंटर यांचे सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. नालंदा क्रिएटिव्ह ग्रुपने विहाराच्या आवारात शिवनेरी किल्ल्याचा हुबेहूब देखावा तयार केला होता .लक्षवेधून घेणार्या या सुंदर देखाव्याचे येथील निगरिकांकडून कौतूक करण्यात आले.शिवजजन्मोत्सवाच्या या कार्यक्रमास शिवसेना खोपोली शहर युवा अधिकारी काव्याताई खोपकर, वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सुवर्णाताई मोरे,भा.बौ.महासभा खोपोली शहर माजी अध्यक्ष बंडूजी कदम,पत्रकार भाई ओव्हाळ,किशोर साळुंके,सचिन यादव उपस्थित होते. वरिल मंडळाला शिवसेना खोपोली शहर उपाध्यक्ष अनिल सानप यांच्याकडून शिवाजी महाराजांचा पूतळा भेट देण्यात आला. विविध संघटनांचे अनेक मान्यवर कार्यकर्ते या सोहळ्या दरम्यान उपस्थित होते. शिवजजन्मोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी वंचित वॉर्ड शाखा अध्यक्ष प्रशांत मोरे,युवा अध्यक्ष संकेत साळुंके,भा.बौ.महसभा वॉर्ड शाखा अध्यक्ष विजय सताणे सुजाता महिला मंडळाच्या सोनाली गायकवाड,ऋतुजा ओव्हाळ नालंदा क्रिएटिव्ह ग्रुपचे उत्तम पवार,अशोक साळवे,संदिप मोरे,गौतम ओव्हाळ,बाबू मोरे, वाघमारे,दिपक लोखंडे,कल्पेश मोरे,लिंबान्ना निलूर,अनिल अंकूश,विनोद अंकूश,जयराम वाघमारे,दत्ता मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...