Skip to main content

खोनपा प्रशासनाने आश्वासन पुर्ण न केल्याने अखेर किशोर साळुंके यांनी उगारले उपोषणाचे हत्यार

खोपोली - (प्रतिनिधी ) खोपोली नगरपरिषद हद्दित मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे , बिल्डरांकडून भाडे तत्त्वावर देण्यात आलेले सदनिका, तसेच शहरातील दूकाने, माँल , दवाखाने , ढाबे, बार , शोरुम, मेडिकल , एटी.एम , शासकीय व निमशासकीय बँका , पतपेढ्या , आदींना भाडेकरु वाढीव घरपट्टी लावणे, शासकीय भुखंडांवरिल कब्जा, त्या जागेवरिल अनाधिकृत बांधकाम तसेच शहरातील बिल्डरांकडून बांधकाम परवाणगी नूसार इमारत उभी न करता शासकीय नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, पार्कींगच्या जागेत बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, व सद्यास्थितीत सूरु असलेली बेकायदेशीर बांधकामे,अनेक वर्ष पडून असलेल्या कारखांदारांच्या व बिर्डरांच्या मोकळ्या जागेला कर अकारुन महसुल जमा करणे, कंपन्यांमध्ये झालेली बांधकामे या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन खोपोली प्रशासनाने दिले होते.परंतू त्या समस्या जैसे थे असल्याने अखेर बहुजन युथ पँथरचे खोपोली शहराध्यक्ष किशोर साळुंके हे खोपोली नगरपरिषदे समोर उपोषण करणार आहेत.बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी वैयक्तिक पातळीवर खोपोली नगरीत सर्व्हे करुन शहरातीत वरिल विविध विषयांबाबत खोनपाला माहीती देवून गेल्या दोन वर्षांपासून याकामी सातत्याने या विविध सामाजिक विषयांबाबत शासकीय स्तरावर कारवाई व्हावी यासाठी तक्रारी अर्ज केलेत तसेच पुन्हा त्या तक्रार अर्जांवर स्मरण पत्र व माहीतीच्या आधिकारातून माहीती मागविण्यात आली असता या तक्रार अर्जांना उडवाउडवीची उत्तरे देत अर्जांना केराची टोपली दाखविली. आपल्या पत्रांना न्याय भेटत नसल्याने किशोर साळुंके यांनी दि,२६ जानेवारी २०२२ रोजी खोपोली नगरपरिषदे समोर अमरण उपोषण करण्याचे ठरवून शासनदरबारी तसा पत्रव्यवहार केला होता.या उपोषणाच्या अर्जानंतर खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी दुरे यांनी उपोषण करते किशोर साळुंके व शहरातीत पत्रकारांनासोबत चर्चा करुन सर्व समस्या दूर करु , साळुंके यांनी केलेल्या प्रत्येक अर्जानूसार कारवाई करण्याचे आश्वासन देवून तसे पत्र उपमुख्याधिकारी यांच्या सहिनिशी दिल्याने , त्या पत्राचा आणि सदर आधिकार्रांच्या विनंतीचा मान ठेवून साळुंके यांनी दि.२६ जानेवारीचे उपोषण तात्पूर्ते स्थगित केले होते,परंतू बरेच दिवस उलटूनही खोपोली नगरपरिषदेकडून आश्वासन पुर्ण केले गेले नाही. वरिल विषयांबाबत पुन्हा स्मरणपत्रही दिले.पालिका अधिकार्यांंनी या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर विविध मागण्यांसाठी अखेर किशोर साळुंके यांनी दि.०८ मार्च २०२२ रोजी उपोषण करणार असल्याचे पत्र बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाई जाधव व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याशी चर्चा करुन जमा केले. दि. ०८ मार्च रोजी होणारे उपोषण हे आर नाही तर पार ची लढाई असल्याचे किशोर साळुंके यांनी सांगितले असून बहुजन युथ पँथर संघटनेसह खोपोली शहरातीत विविध सामाजिक संघटना , धार्मिक संघटना , पत्रकार संघटना , शहरातील नागरिक व मित्रपरिवारांचा या उपोषणास जाहीर पाठिंबा असल्याचे कळविले आहे. (""खोपोली नगरपरिषदेचे बरेच अधिकारी मुजोर झाले असून गेंड्यांची कातडी पांघरुन सामान्य जनतेचा आवाज दडवून बिल्डर व धनदांडग्यांना अर्थपूर्ण पाठीशी घालत शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसुल बुडवत असून ही रक्कम त्या अधिकार्यांकडून वैयक्तिक रित्या वसूल करुन माझ्या तक्रार अर्जांनूसार त्वरित कारवाई व्हावी यासाठी मी उपोषण करित आहे..."" किशोर साळुंके ) अध्यक्ष - खोपोली शहर बहुजन युथ पँथर

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...