खोपोली - महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरीकांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी लोकांच्या सेवेसाठी कायम जागृत असलेली कर्तव्यदक्ष फाऊंडेशन संभाजीनगर , औरंगाबाद , महाराष्ट्र संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष विठ्ठल तनपुरे (पाटील) यांनी केली असून या संस्थे मार्फत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असून हे कार्य पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यामधील नेहमी चर्चेत असलेले संभाजी ब्रिगेड , शंभू राजे युवा क्रांती सेना यामधे आक्रमकतेने काम केलेले अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे डॅशिंग सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले अंकुश हाडप यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे...
कर्तव्यदक्ष फाऊंडेशन संस्थेत अंकुश हाडप यांची निवड होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील गाव व शहरांमध्ये जर कोणा गरीब , गरजू , गरीब व महिला यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी संपर्क साधावा अन्याय करणार्यांना आम्ही कायद्याची अंमलबजावणी करत कारवाई करू असे आवाहन प्रदेश अध्यक्ष अंकुश हाडप यांनी केले आहे...
अंकुश हाडप - 7219238514
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment