Skip to main content

खोपोली शहरात संपन्न झाले रक्तदान शिबीर

खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंके ): लायन्स क्लब खोपोली, अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक यांच्या विद्यमाने डॉ रामहरी धोटे सभागृह - लायन्स सर्व्हिस सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घघाटन अल्टा लॅबोरेटरीजचे डायरेक्टर आदित्य आणि रीचा धोत्रे यांच्या हस्ते झाले. गोदरेज बॉईज कंपनीचे सीएसआर फंडाचे इन्चार्ज तानाजी चव्हाण, पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, सहाय्यक पोलीस निरक्षक हरीश काळसेकर, समर्पण ब्लड बँकचे अभय तन्ना यांनी शिबिर प्रसंगी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. अल्टा लॅबोरेटरीजचे डायरेक्टर रीचा धोत्रे यानी उद्घाटनाच्या औपचारिकते सोबत रक्तदानाचे कर्तव्यही पार पाडले. लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अल्टा लॅबरोटरिजच्या कामगारांनी देखील रक्तदानाचे कर्तव्य बजावले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षा पासून सुरू केलेला रक्तदानाचा संयुक्त उपक्रम भविष्यातही "अल्टा लॅबोरेटरीजच्या स्थापना दिवसाच्या" निमित्ताने सुरू राहील, असे प्रतिपादन करताना सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष महेश राठी यांनी केले.

Comments