Skip to main content

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचा गौरव... सहज निसर्ग शाळेचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून जागतिक उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव..

मुंबई... सहजसेवा फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असते.सातत्यपूर्ण उपक्रम ही सहजसेवेची ओळख आहे तर सामाजिक उपक्रमातुन नवनवीन जागतिक रेकॉर्ड ही संस्थेची उपलब्धी आहे. दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा ही वंचित व उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी वरदान ठरत आहे.झाडाखाली भरलेल्या शाळेला खऱ्या खुऱ्या शाळेचे रूप आलेले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था या शाळेसाठी भरीव योगदान देत आहेत. 26 जानेवारी 2022 रोजी वीटभट्टी कामगारांच्या सहज निसर्ग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.टाटा स्टील लिमिटेडचे आस्थापण प्रमुख कपील मोदी व खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल यांनी संस्थेच्या सहज अन्नसेवा, सहज मनोरुग्ण स्वच्छता, सहज स्वर्गरथ, सहज वैद्यकिय उपकरणे, सहज स्वर्गपेटी,सहज सामुदायिक विवाह,सहज आपत्कालीन मदत व विविध कार्याची माहिती घेऊन उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, सहज निसर्ग शाळेत शिक्षकरुपात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन, संघटक अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी रसायनी येथील कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे,नवी मुंबई येथील नीरज पंत उपस्थित होते.या उपक्रमात व्हिजन फ्रेश यांनी सह आयोजकाची भूमिका बजावली आहे. वंचित व उपेक्षित घटकांना सहजसेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते. लोकसहभागातून उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या मदत कार्यात भरीव योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार अर्पण केल्याची भावना संस्थेच्या कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...