खोपोली - ( किशोर साळुंके ) खोपोली नगरपरिषद हद्दितील मुकुंदनगर येथील रहिवासीयांची वहिवाट एका खाजगी व्येक्तिने रोखल्याने येथील खोपोली नगरपरिषदेने त्या विरोधात कारवाई न केल्याने येथील नागरिक उद्या दि.०२ मार्च २०२२ रोजी उपोषण करणार आहेत .खोपोली नगरपरिषद हद्दितील मुकुंदनगर येथील जय गणेश सोसायटी व ओम दर्शन सोसायटीकडे जाणार्या रस्त्यात तेथील एका नागरिकाने अडथळा आणला आहे.खोपोली नगरपरिषदेने या परिसरात जाण्यास रस्ता करुन द्यावा ही अनेक वर्षांंची मागणी आहे.जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालयाकडून सदर रस्ता खोपोली नगरपरिषदेने त्वरीत येथील नागरिकांसाठी तयार करुन सदर जागा मालकास त्याचा मोबदला शासकीय किंमतीनूसार अदा करण्याचे आदेश दिले असतानाही खोपोली नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याने सदर सदर व्यक्तीने हा रस्ता बंद केल्याने येथील नागरिकांची हेळसांड होणार आहे.दुचाकी , चार चाकी , रुणवाहिका , रिक्षा या रोडवरुन जावू शकत नाही.यामुळे येथील रहिवासीयांची प्रचंड हाल होत आहेत.तेव्हा समस्या सोडविण्याबाबत खोपोली नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत येथील नागरिक उद्या दि.०२ मार्च २०२२ रोजी खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करित असल्याचे त्यांनी महाराष्ट्र टाईम्स 25 न्युज ला सांगितले आहे
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment