गगनगिरीनगर येथे उद्यान व ओपन जीम चे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धघाटन सोहळा संपन्न .. कार्यसम्राट समजल्या जाणार्या माजी नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे यांचे सर्वत्र कौतुक ..
.
खोपोली ( किशोर साळुंके )
खोपोली नगरपरिषद हद्दितील गगनगिरीनगर येथील कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्या स्थानिक नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या उद्यानाचे व खुल्या व्यायाम शाळेचे उद्धघाटन रायगड जिल्हापरिषदेच्या सदस्या चित्राताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.आपल्या प्रभागासाठी प्रामाणिकपणे अनेक भरीव विकासकामे करुन आपल्या पदाला खर्या अर्थाने न्याय देणारे फारच कमी नगरसेवक , नगरसेविका शहरात पहायला मिळत असून त्यापैकी एक माधवी रिठे या भरीव विकासकामे करणार्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. म्हणून त्यांना प्रभागातच नाही तर शहरात त्यांना कार्यसम्राट नगरसेविका म्हणून बोलले जाते.खोपोली नगरपरिषदेच्या वतीने खोपोली नगरपरिषद हद्दित काही मोजक्याच प्रभागांमधे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे पहावयास मिळते.त्याच माध्यमातून गगनगिरीनगर येथील नगरसेविका माधवी रिठे यांच्या मागणी व पाठपूराव्या नूसार भव्य असे उद्यान व खुल्या व्यायाम शाळेचे उद्धघाटन करण्यात आले.तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील गगनगिरी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी लेझीमचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक महीलांनी यात सहभाग घेतला तर माधवी रिठे यांनीही लेझीम खेळण्याचा आनंद लूटला तसेच होममिनिस्ट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .खेळ रंगला पैठणीच्या या होममिनिस्ट या खेळामधे प्रथम क्रमांक सिंधुताई विणेरकर तर द्वितीय क्रमाक सोनम जाधव पटकवला माधवी रिठे यांनी सुंदररित्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे रिठे यांचे उपस्थितीतांकडून यावेळी भरभ कौतुक होताना दिसत होते शुभ प्रसंगी या उद्यानाचे व खुल्या जिमचे उद्धघाटन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खालापूर नगरपंचायतीच्या मा.नगराध्यक्षा शिवानी जंगम , विद्यमान नगरसेवक संतोषभाई जंगम ,खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अविनाश तावडे, अमोल जाधव , नितीन मोरे, महिला नगरसेविका , विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment