रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती प्रतिदास दल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिदास दल कमांडट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स, नागरी तथा गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक, एन सी सी चे कॅडेट्स तालुका स्तरीय सर्व कार्यालयांचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान यांना पूर परिस्थिती, दरड कोसळणे, रस्ते अपघात, कंपन्यातील दुर्घटना, रसायन आणि वायू गळती अशा प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती संबंधात एकदिवसीय शिबिराचे आयोजन खालापूर तालुका तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या नेताजी पालकर सभागृहात करण्यात आले होते.
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांनीही यावेळी मार्गदर्शन केले आणि उपस्थिती दर्शवली.
एन.डी.आर.एफ कडून सब इन्स्पेक्टर एस पी थोरात, सब इन्स्पेक्टर रवींद्र, हवालदार योगेश साबळे, संतोष जाधव, संतोष शिंदे, योगेश थोरात, गणेश महाजन, रावसाहेब डोईफोडे यांनी प्रात्यक्षिकासह प्राथमिक उपचाराचे धडे देत प्रशिक्षणार्थीकडून उपस्थीत केलेल्या शंकांचे निवारण देखील केले. या शिबिरात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सहज सेवा फाउंडेशन, यशवंती हायकर्स या संस्थांचे सदस्य,के एम सी कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. खालापूर तालुक्याचे बी. डी. ओ. बालाजी पुरी, नायब तहसीलदार राजश्री योगी यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment