कर्जत कडाव येथील आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांना सुविधा न मिळाल्यास बहुजन युथ पँथर आंदोलन छेडणार - सुशीलभाई जाधव
खोपोली -( किशोर साळुंके ) कर्जत तालुक्यातील कडाव येथे साधारण बारा एकरात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्या सामान्य नागरिकांना योग्य त्या सुविधा नसल्याने संबंधीत अधिकारी यांच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन युथ पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांनी दिला आहे.कर्जत तालुक्यातील कडाव येथे भव्य असे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.येथे चोवीस तास सुविधा देणे बंधनकारक असतानाही त्या सुविधा दिल्या जात नाहीत.येथील अधिकारी ठरलेल्या वेळेत येत नसल्यामुळे येथे येणार्या रुग्णांना तासंतास थांबावे लागात आहे .वरिल केंद्रात ज्या सुविधा मिळणे अपेक्षित आहेत त्या सुविधांमधील अनेक गरजेच्या वस्तु रुग्णांना बाहेरुन आणण्यास सांगण्यात येते.कधी कधी इंजेक्शन न देताच फक्त गोळ्यांवरच भागवल जात आहे.त्यामुळे सामान्य गरिब रुग्णांना प्रचंड नाहक त्रास सहन करवा लागत आहे.तेव्हा या सर्व सुविधा सुरळीत करुन नागरिकांना पुरविण्यात आल्या नाहीत तर संबंधीतांविरोधात तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाई जाधव यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment