खोपोली - (किशोर साळुंके )
रायगड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे अधिकारी तथा खोपोली नगरिचे सुपुत्र राजेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला रायगड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश पाटील यांचा वाढदिवस १४ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी रायगड , खालापूर व खोपोली शहरातील सर्व मित्र परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पोलीस सहकारी मित्रांनीही राजेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.सदर प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी युवा नेते प्रसाद वाडकर ,माजी.नगरसेवक संजय पाटील, पत्रकार तथा बहुजन युथ पँथर संघटनेचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके ,युवा नेते प्रमोद महाडीक ,पत्रकार सचिन यादव यावेळी उपस्थितीत होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment