साहित्यिका सौ. उज्वला वामनराव दिघे* यांची *कोकण मराठी साहित्य परिषद* (को मा स पा) खोपोली शाखेच्या *अध्यक्षपदी* बिनविरोध निवड
खोपोली -(किशोर साळुंके )-
उज्वला दिघे यांचे ५ कथासंग्रह, ३ कादंबऱ्या, १ काव्यसंग्रह व १ लावणी संग्रह अशी दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील ३ पुस्तकांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शाळा, कॉलेज, महिला मंडळाच्या माध्यमातून त्या काव्यवाचन करतात. लावणीचे पुस्तक लिहिणाऱ्या त्या पहिल्याच कवयित्री आहेत.
सामाजिक, कला अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उज्वला दिघे या महाराष्ट्राचे थोर साहित्यिक कै. र. वा. दिघे यांचा स्नुषा असून त्या आज या घराण्याचा साहित्य वारसा समर्थपणे पुढे चालवीत आहेत.
को म स पा च्या खोपोली शाखेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आणि आपले साहित्य निरंतर चालू राहो आशा शुभेच्छा भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव, माजी शहर अध्यक्ष विजय तेंडुलकर, मंडळ सरचिटणीस प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकीय सेलचे सह- संयोजक विकास खुरपुढे यांना त्यांचा निवासस्थानी दिल्या. या वेळी वामनराव दिघे आदी भाजपचे पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.
Comments
Post a Comment