खालापूर तालुक्यातील नागरिकांना देवनाव्हे ग्रामपंचायत मोफत दाखवणार मराठ्यांची गौरवगाथा महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज व सभाजी महाराजांचा धगधगता इतिहास
खोपोली :- (किशोर साळुंके )
खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्रामपंचायत दरवर्षी विवीध कार्यक्रम साजरे करीत असतानाच रविवार दि.६ मार्च २०२२रोजी सांय- ६.३० वा. सांगडेवाडी, पाटील क्रिंडागण, अँडलब इमेजिका समोरील भव्य मैदानात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राज्याच्या धगधगता इतिहास सांगणारे जिवंत महानाट्य मराठ्यांची गौरवगाथा दाखवणार आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीत सन २०१७ ते २०२१ या चार वर्षात केलेल्या विकासकामांचा कार्य अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंचा धगधगता इतिहास दाखविणारे महानाट्य नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहे. हे नाटक 100 फुटी उंच दोनमजली रंगमंचावर जिवंत घोडे , हत्ती , तोफा , उंट , बैलगाड्या या नाटकात दाखवणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अंकीत साखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले . याप्रसंगी उपसरपंच चौधरी, शिवदुर्ग महानाट्य मित्र मंडळाचे सरचिटणीस सुनिल गायकवाड, प्रविण देशमुख, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, स्नेहल कडव, वृषाली नलावडे, ग्रामसेवक प्रमोद काळे, ग्रामस्थ संजय कडव, बंटी नलावडे, भूषण कडव, नितीन चौधरी, सुधीर चौधरी श्रीकांत पाटील यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विनामूल्य दाखवणारी देवनाव्हे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. नाटक पाहण्यासाठी पाच हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे . शाळकरी मुलांना , युवा व युवती , महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे
ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे तर्फे मराठ्यांची गौरवगाथा हे नाट्य विनामूल्य दाखवणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा
अंकित साखरे
सरपंच ,देवनाव्हे ग्रामपंचायत
Comments
Post a Comment