Skip to main content

कु. श्रुती सागर शेवते यांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खोपोली पोलीस ठाण्याचा प्रतिकात्मक स्वरूपात प्रभारी निरीक्षक पदाचा सन्मान प्रदान.

खोपोली प्रतिनिधी :- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कु. श्रुती सागर शेवते यांच्या हाती प्रभारी पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे प्रतिकात्मक स्वरूपात सोपवून महिलांचा सन्मान केला. त्याच सोबत पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छतेची कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती अनिता संतोष करकरे यांचा सन्मान करतांना त्यांना सोबतच्या आसनावर स्थानापन्न केले. खोपोली सारख्या अतिमहत्त्वाच्या पोलिस स्टेशनची जबाबदारी आपल्या खांद्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी कुमारी श्रुती सागर शेवते यांनी प्रतिकात्मक स्वरूपात पदभार सांभाळल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना प्रतिपादन केले. खोपोली पोलीस ठाण्याच्या सर्व महिला कर्मचारी वर्गाला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला कर्मचारी वर्गाचे कौतुक करताना त्यांना रोख रकमेचे बक्षीसही दिले. आपल्या सोबत रात्रंदिवस ड्युटी बजावताना महिला कर्मचारी कार्यक्षमतेत कुठेच कमी पडत नाही ही स्वतःसाठी गर्वाची बाब असल्याचे त्यानी सांगितले. प्रभारी पोलीस निरीक्षक कु. श्रुती सागर शेवते यांच्या हातून निरंतर देशसेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये ए.पि.आय. हरेश कळशेकर आणि कर्मचाऱ्यां समवेत पत्रकार देखील उपस्थित होते. या आयोजनात झालेल्या सन्मानाने सर्व महिला कर्मचारी वर्ग आनंदित झाला होता.

Comments

Popular posts from this blog

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

नगरसेवक किशोर पानसरे यांनी केलेल्या प्रभाग तिन मधील हटके भूमिपूजनाचे सर्वत्र कौतुक

खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) : खोपोली शहरात गेले काही महिन्यांपासून विविध विकास कामांचे भूमिपूजन सूरु आहेत.ही भूमी पुजने होत असताना प्रभागा क्रमांक तिनचे धडाडीचे व प्रभागाचा विकासाठी आहोरात्र झटणारे कार्यसम्राट म्हणून ज्यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये छाप उमटविणारे किशोर पानसरे यांनी आपल्या प्रभागातील भूमिपूजनाचे वेगळ्याच पद्धतीने , हटके भूमिजनाला सूरवात केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या प्रभागातील नव्याने विवाह झालेल्या नवं दांपत्य यांच्या हस्ते भूमिपूजन केले. नगरसेवक किशोर पानसरे यांनी आपल्या मनोगतात विचार मांडताना सांगितले कि,ज्यांच्या प्रामाणिक काम केलेल्य व माझ्यावर विश्वास दाखवून आज या नगरसेवक या पदावर विराजमान करणारे जेष्ठ नागरीक , मित्रपरिवार , वार्डातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा मान देत भूमिपूजन करुन घेत आहोत. शहरातील प्रकाशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व सोनू चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागून सांड पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठीकाणी सांडपाण्यामुळे दुर्...

अखेर खोपोलीकरांची प्रतीक्षा संपली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते होणार

......खोपोली.... संपादकीय.... ---------------------------------------- खोपोली नगर परिषद यांच्या वतीने गेल्या साधारण ३०वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवीला होता. सदर पुतळा अनेक वर्ष झाल्याने जीर्ण झाला होता. तो पुन्हा नव्याने उभारावा ही समस्त खोपोली करांची मागणी होती. सदर पुतळ्याचे जीर्ण झालेले अवशेष अथवा खपले पडत असल्याची प्रत्यक्ष दर्शी बातमी पत्रकार सचिन यादव यांनी काही वर्षांपूर्वी ६ डिसेंबर रोजी समोर आणून साप्ताहिक जनता मंच मध्ये छापून आणली. यानंतर सर्व जिल्ह्यात खलबळ माजली आणि खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या काळात ठराव करून नव्याने पुतळा बसविण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. आज सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून सध्याच्या खो. न. पा. नगराध्यक्षा सुमन मोहन औसरमल आणि सर्व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय नेतेगन, शिव /फुले /शाहू /आंबेडकर प्रेमी, विचारवंत यांच्या प्रयत्नानी आज नव्याने भव्य दिव्य असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून उद्या 4ऑक्टोबर रोजी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास ...