डॉ. शेखर जांभळे यांची अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी समिती वर स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य पदी निवड.
खालापूर....सहज सेवा फाउंडेशन ही समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी सातत्यपूर्ण कार्य करीत असते. हाती घेतलेले काम तडीस नेणे ही एक हातोटी असलेली संस्था म्हणून जनमानसात उल्लेख आहे.वंचित व उपेक्षित घटकांसाठी कार्य करण्याच्या उद्देश्यातुन ज्यांना खरच शिक्षणाची आवड आहे परंतु घरच्या परिस्थिती मुळे शिक्षण घेऊ शकत नाही, आई-वडील विटभट्टीवर मोलमजुरी करत असणाऱ्या मुलांना व खालापूर तालुक्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी 19 डिसेंबर 2021 पासून दर रविवारी महड व शेडवली येथे संस्थेची सहज निसर्ग शाळा सुरू आहे.समाजप्रति एक आदर्श ठरणाऱ्या या उपक्रमातून समाजास एक वेगळा संदेश मिळत आहे. संस्थेने अनाथ असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करीत असल्याने अनेक दानशूर व्यक्ती व मदतनीस संस्थेच्या कार्यात मदत करीत आहेत. या उपक्रमाची नोंद घेऊन खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांची अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी समिती वर स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केलेली आहे.तळागाळातील वंचित व उपेक्षित घटकांना याचा लाभ होईल यासाठी झालेल्या या नेमणुकीचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील विविध घटकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment