(खोपोली - किशोर साळुंके ) ) - रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील, यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले . वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक ...