शितल गायकवाड कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ ने सन्मानित
(खोपोली - किशोर साळुंके ) -
शोतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशन ने आता पर्यंत केल्याल्या कामगिरीला आता खऱ्या अर्थाने यश मिळायला सुर्वात झाली आहे. पहिल्यांदा अथक परिश्रमाचे श्रेय आणि आता या गुणांचे कौतुक असा काहीसा अनुभव या असोसिएशनच्या संचालिका शितल गायकवाड यांना अनुभवायला मिळत आहे.पुण्यातील
कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इनोव्हेशन आणि रिसर्च प्रेझेंट यांच्या वतीने अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या शुभहस्ते नुकताच कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खोपोली शहरातील विद्यार्थ्यांना शोतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहचविण्याचे काम शितल कृष्णा गायकवाड या तरूण मुलीने केले आहे.शेकडोच्या घरातील गोल्ड मेडल मिळवित तिने खोपोली शहराचे नाव खेळाच्या मैदानात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आज शितल गायकवाड या नावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठीच्या प्रयत्नाला आता यश मिळायला लागले असल्याचे शितल गायकवाड यांचा होता त असलेला सन्मान पाहून दिसून येत आहे. भारत भूषण या सन्मानाच्या पुरस्कारा नंतर तिचे ठिकठिकाणी होणारे कौतुक तिच्या कामाची खरी पोच पावती असल्याचे दिसून येत आहे.शितल गायकवाड यांना नुकताच कोरेगाव पार्क पुणे येथे कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आल्याने खोपोली शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतांना दिसत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment