(खोपोली - किशोर साळुंके ) ) -
रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील,
यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले .
वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक ,क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला.यात आदर्श सामाजिक कार्य म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम साळवी , आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील , आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, आदर्श महिला उद्योजिका व उद्योजक म्हणून सुरेखा खेडकर व खोपोली गॅस कंपनीचे उदय साखरे , आदर्श बिल्डर म्हणून कल्याणी गृपचे संचालक खेमंत टेलर , आदर्श सरपंच म्हणून अंकित साखरे , आदर्श डॉक्टर म्हणून डॉ हेमंत पाटील , डॉ प्रसाद पाटील , आदर्श ग्रामपंचायत म्हणून खरीवली ग्रामपंचायत, आदर्श क्रीडा प्रशिक्षक म्हणून शीतल गायकवाड, आदर्श सामाजिक संस्था म्हणून सहज सेवा फाउंडेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तसेच र.वा.दिघे राज्य स्तरीय पत्रकार पुरस्कार आघाडीच्या वृत्त निवेदिका सुवर्णा धानोरकर तर जीवन गौरव पुरस्कार खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व वरिष्ठ राजकीय नेते दत्ताजी मसुरकर यांना आमदार महेंद्र थोरवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे , खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर प्रेस क्लब च्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेत कौतुक केले. अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी प्रास्ताविक, जगदीश मरागजे यांचे उत्तम सूत्र संचालन व आभार प्रदर्शन खालापूर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी मानले .पुरस्कार सोहळ्यात गीत गंधार यांचा बहारदार मराठी ,हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रेस क्लब च्या सर्व सदस्यांनी व पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment