Skip to main content

श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. शेखर जांभळे यांनी आयोजीत केला उपक्रम... खोपोली... .

आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये प्रवेशासाठी सहज मार्गदर्शन शिबिर संपन्न... श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. शेखर जांभळे यांनी आयोजीत केला उपक्रम... खोपोली... ( किशोर साळुंके ) सहज सेवा फाउंडेशन विवीध क्षेत्रात सातत्यपूर्ण सामाजीक कार्य करीत असते.शिक्षण क्षेत्रातील वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षण मिळावे या हेतूने वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणारी सहज निसर्ग शाळा ही समाजास आदर्श देणारी ठरत आहे.शिक्षण क्षेत्रातील सामाजीक भावनेतून नवीन उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या मातोश्री श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सैन्यात जाण्याची इच्छा बऱ्याच विद्यार्थ्यांची असते, परंतु योग्य माहिती नसल्याने ही इच्छा प्रत्यक्षात उतरत नाही. यासाठी 10 वी पासूनच तयारी केल्याने तिन्ही दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अचूक व अनुभवी मार्गदर्शन दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झाले. सैन्यातील 28 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कमांडर सचिन पवार यांनी विद्यार्थी व पालकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडताना कोणती शाखा व विषय निवडावेत हे समजावून सांगितले यावेळी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. या उपक्रमास खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार,खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते,व्ही.डी.एम.स्कूलच्या संचालिका तेजस्वी देशमुख, उद्योजक दिवेश राठोड,सुजीत पडवळकर, पल्लवी पडवळकर,शिशु मंदिरच्या शिक्षिका आशा देशमुख,ॲड.मुनिदास गायकवाड,प्रवीण जाधव,ईश्वर कासार व मार्गदर्शन ऐकण्यासाठी 100 पेक्षा ज्यास्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार व खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी विद्यार्थी व पालकांना भविष्यातील करिअर निवडताना काय करावयास हवे यासाठी भूमिका विषद केली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, उपाध्यक्षा ईशिका शेलार,सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी.निरंजन,संघटक अखिलेश पाटील,जनसंपर्क प्रमूख जयश्री कुलकर्णी,मार्गदर्शक मोहन केदार,बंटी कांबळे,अजय कांबळे,सोनाली गाढवे,जयश्री भागेकर यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले. कर्जत खालापुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये प्रवेशासाठी शाळांमधून सहज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा सहज सेवा फाउंडेशनचा मानस आहे. पार पडलेल्या उपक्रमातून विद्यार्थी व पालकांनी अश्या प्रकारच्या उपक्रमाची आवश्यकता आहे असे सांगून सातत्यपूर्ण या उपक्रमाचे आयोजन करावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...