खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खोपोली महिला अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे (गायकवाड )यांनी शहर अध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा अहवाल तयार करून मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करून विविध मान्यवरांना सदर अहवाल भेट देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात तरुणांची फळी उभी करण्यास सुरुवात झाली. पक्षातील प्रत्येक घटकात, कमीट्यानमध्ये वरिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची फळी उभारण्याचे काम सुरु झाले. यात महिला कमिटी सुद्धा आली आणि सर्व राज्यात युवा कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे कार्य सुरु असताना खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा पदी सुवर्णा संतोष मोरे यांची निवड रायगड चे महामहीम खासदार सुनिल तटकरे यांनी केली.
सुवर्णा मोरे यांनी खोपोली शहर अध्यक्षा म्हणून पदाभार स्वीकारल्यापासूनचा त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच गेला आणि जात आहे. महिला सक्षमीकरण असो, मुलांच्या कला गुणांना वाव मिळणे असो, वृक्षारोपण असो, मदत असो, सामाजिक उपक्रम असो, जनतेच्या भल्यासाठी शासनाचा निषेध असो, महिला एकत्रीकरण असो,प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा वाखानन्याजोगाच आहे.
या खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनचा सर्व प्रवास या लोकार्पण केलेल्या कार्य आढावा अहवालात नमूद केला असून पक्षाच्या वरिष्ठ मान्यवरांनी व अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केला. कोरोना काळामुळे लोकार्पण सोहळा कार्यालयीन करण्यात आल्या नंतर सदर अहवाल विविध मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आला.
संबंधित छायाचित्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, रायगड जिल्हा माजी अध्यक्ष /खोनपा मा. नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, युवक अध्यक्ष अतुल पाटिल,खोनपा नगरसेवक मोहन औसरमल, खोपोली पत्रकार संघांचे कार्याध्यक्ष सचिन यादव यांना महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे सदर अहवाल भेट म्हणून देताना पहावयास मिळत आहे.
........... (संपादक)
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Very nice work ma'am
ReplyDelete