Skip to main content

Posts

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

खोपोली पोलीस ठाण्यात बॅडमिंटन हॉल चे उदघाटन संपन्न

खोपोली :(किशोर साळुंके) : खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत उभारण्यात आलेल्या शाहिद श्री. अशोक कामटे बॅडमिंटन हॉल चे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस कर्मचारी सतत कामात गर्क असल्याने त्यांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ही बाब लक्षात घेऊन खोपोली पोलीस ठाण्याच्या आवारात बॅडमिंटन हॉल उभारण्यात आले व त्यास शहीद श्री अशोक कामटे बॅडमिंटन हॉल नाव देऊन त्यांच्या बलिदानास सन्मानित करण्यात आले. आज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , डीवायएसपी खालापूर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यासमयी पोलिसांच्या नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

तुपगावच्या रेशन दुकानात होणारा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा -सुशील भाई जाधव

खोपोली -(किशोर साळुंके)- खालापूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तुपागाव येथिल रेशन दुकानात मोठा भ्रष्टाचार होत असून पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी त्याची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी बहुजन युथ पँथर चे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली आहे. खालापूरातील तुपागाव येथे सुरेख जितेंद्र पांडे यांचे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात आहे. अनेक वर्षांपासून या दुकानदाराकडून धाण्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक करीत असून त्या बाबतची लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार, खालापूर पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे बहुजन युथ पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जण आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत पिंपरी-चिंचवड मधील अनाधिकृत बांधकांवरील कारवाई तुर्तास थांबवा.*पिंपरी-चिंचवडम महापालिका आयुक्त राजेश पटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी...*

. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी . पिंपरी - चिंचवड -- कोरोना आणि लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे हाल झाले आहेत. अनाधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने १००० चौरस फूटपर्यंत बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यामुळे १ हजार चौरस फुटापर्यंतची अनियमित बांधकामांवर प्रशासनाला कारवाई करता येणार नाही. तसेच, अनाधिकृत बांधकामांबाबत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत अनाधिकृत बांधकाम कारवाई करु नये अशी मागणी शिवशाही व्यापरी संघाचे संस्थापक , अध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेला निवेदनाद्वारे केली .

. प्राची भोईर हिने कुस्तीत रायगड जिल्ह्याची मान उंचावली. राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक.

खोपोली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, एन. बी. ग्रुप व निकाळजे ग्रुप पुरस्कृत, विकास ग्रुप यांच्या विशेष सहकार्याने 23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 ही सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटांमध्ये कु. प्राची भोईर या कुस्तीपटूने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल - खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.प्राची कुस्तीचा सराव करते. या स्पर्धेमध्ये सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे येथील कुस्तीपटुंचे वर्चस्व असताना कु. प्राची भोईरने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कु. प्राचीने मिळविलेले पदक ही त्याची नांदी आहे. त्यामुळे तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार बाळाराम पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्...

स्वप्निल जाधव यांची नियुक्ती .. शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी स्वप्नील अनिल जाधव यांची निवड जाहीर.

खोपोली प्रतिनिधी-शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन अण्णा लिमकर यांच्या सुचनेने व चिंचवड विधानसभा अध्यक्ष धनराज दाखले यांच्या अनुमोदनाने *स्वप्नील अनिल जाधव* यांची पिंपरी चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी निवड मुंबईमधून संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज जाहीर केली. नवनियुक्त ग प्रभाग अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमधील व्यापारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक,दिव्यांग बांधव, बांधकाम मजूर बांधव यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

किशोर पानसरे ..विकासाचे वारे.....किशोर पानसरे यांच्या पूढाकारातून प्रकाशनगरमधे ओपन जिमचा उद्धघाटन.सोहळा संप्पन्न...

किशोर पानसरे ..विकासाचे वारे.. खोपोली - (किशोर साळुंके ) खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक तिन मधील प्रकाशनगर येथे या प्रभागातील विकास पुरुष समजले जाणारे किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून या प्रभागातील विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून ओपन जिमचा उद्धघाटन सोहळा संप्पन्न झाला. कोरोना या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग थांबले होते .या आजाराने अनेकांचे बळी घेतले,यावेळी ज्यांचे शरीर निरोगी व सुदृढ होते अशा लोकांना या आजारावर मात करता आली. उत्तम शरीर असेल तर मन सुद्धा उत्तम राहील तसेच विविध आजारांवर मत करण्यासाठी आज व्यायाम करणे हि काळाजी गरज ओळखून पानसरे यांच्या प्रयत्नातून प्रभाग तिनमधे ओपन जिम सूरु करण्यात आली.या प्रभागातील विविध गावांमधे नागरीकांच्या आरोग्याचा विचार करत प्रभाग तिनमधे पानसरे यांनी एकून पाच ते सहा ओपन जिम सूरु केल्यामुळे पानसरे यांचे या विभागातील नागरिकांकडून कौतूक होत आहे. नगरसेवक पानसरे यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत प्रभाग तिनमधे यांनी अनेक भरीव विकासकामे मार्गी लावून येथील नागरीकांची मने जिंकली असल्याने तसेच नगरसेवक या पदाची काही महीने शिल्लक असताना सु...