Skip to main content

Posts

मुजोर फेरीवाल्याचा महिला सहाय्यक आयुक्तांंवर कोयत्याने हल्ला ..दोन बोटे तूटून रोडवर पडली.... याहल्याच्या निषेधार्थ खालापूर तालुक्यातील सर्व शासकीव कार्यालयाकडून काम बंद करुन केला जाहिर निषेध ...

. खोपोली ..(किशोर साळुंके ) रस्ते आडवून भर रस्त्यांवर भाजी विक्रि करणार्या मुजोर भाजी विक्रेत्याकडून कर्तव्य बजावणार्या ठाणे पालिकेच्या डँशिग समजल्या जाणार्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळेंवर परप्रांतीय भाजी विक्रेत्याने कोयत्याने केला हल्ला .हा हल्ला इतका भयानक होता कि या हल्यात पिंगळे यांची दोन बोटे तूटून भर रस्यावर पडली .अशा मुजोर हल्लेखोरांच्या दादागिरीला कुठेतरी चाप बसावा यासाठी तसेच कर्तव्यदक्ष अधिकार्यांवर अशा प्रकारचे जिवघेणे हल्ले होवू नयेत अशा मुजोरांवर कुठेतरी जरब बसून संबधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी खालापूर तालुक्यातील नगरपंचायत,खोपोली नगरपरिषदेसहीत संपूर्ण तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या वतीने ,नियम कायदे मोडणार्यांनी केलेल्या कृत्याचा जाहिर निषेध करत संपूर्ण काम बंद अंदोलन करण्यात आले.

खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुलाचे निर्माण

खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके )राजू कुंभार यांनी साकारले "कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल". कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे दि.29 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साधून उद्घाटन आणि क्रीडा शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. संकुलाचे उद्घाटन रायगड भूषण आणि रायगड केसरी सन्माननीय प्रकाश हातमोडे आणि गोदरेज आणि बॉईस कंपनीचे प्रबंधक तानाजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीय क्रीडा अधिकारी संदिप वांजळे, छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर ,दत्तात्रय पालांडे, कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे, सुभाष घासे, दिलीप देशमुख, गुरूनाथ साठेलकर, सुनील नांदे,एकनाथ कुरळे,दिनेश मरागजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. या संकुलाची निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांनी कुस्ती या क्रिडाप्रकारात विषेश करून महिला खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळी पासुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणार असल्याचे आणि यापूर्वीपासुन सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत कुस्ती मह...

राष्ट्रवादी महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या कार्य आढावा अहवालाचे लोकार्पण संपन्न

खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खोपोली महिला अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे (गायकवाड )यांनी शहर अध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा अहवाल तयार करून मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करून विविध मान्यवरांना सदर अहवाल भेट देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात तरुणांची फळी उभी करण्यास सुरुवात झाली. पक्षातील प्रत्येक घटकात, कमीट्यानमध्ये वरिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची फळी उभारण्याचे काम सुरु झाले. यात महिला कमिटी सुद्धा आली आणि सर्व राज्यात युवा कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे कार्य सुरु असताना खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा पदी सुवर्णा संतोष मोरे यांची निवड रायगड चे महामहीम खासदार सुनिल तटकरे यांनी केली. सुवर्णा मोरे यांनी खोपोली शहर अध्यक्षा म्हणून पदाभार स्वीकारल्यापासूनचा त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच गेला आणि जात आहे. महिला सक्षमीकरण असो, मुलांच्या कला गुणांना वाव मिळणे असो, वृक्षारोपण असो, मदत असो, सामाजिक उपक्रम असो, जनतेच्या ...

स्व.ह.भ.प. गोटीराम पाटिल यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना भजनी पेहरावाची भेट

खोपोली: (किशोर साळुंके)-खालापूर तालुक्यातील नामवंत व लोकप्रिय असणारे स्व. ह. भ. प. गोटीराम पाटिल यांच्या स्मरणार्थ धाकटी पंढरी साजगांव येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात ह. भ. प. तानाजी महाराज कर्नूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख /गटनेते सुनिल पाटिल यांच्यावतीने वारकरी बांधवांना भजनी पेहराव भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी गटनेते सुनिल पाटिल, नगरसेवक राजु गायकवाड, युवा नेते /उद्योजक हरिष काळे, मनसे शहर उपाध्यक्ष संजय दळवी, शिव व्यापारी सेना उपाध्यक्ष राकेश चव्हाण उपस्थित होते.

स्थानिकांना कंपनीत नोकरीत प्रथम प्राधान्य द्या - शिवसेना अवजड वाहतूक सेनेची मागणी

खोपोली (किशोर साळुंके ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले. *शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* ...

स्थानिकांना कंपनीत नोकरीत प्रथम प्राधान्य द्या - शिवसेना अवजड वाहतूक सेनेची मागणी

खोपोली (प्रतिनिधी ) ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले. *शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* व *...

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज अखेर सूत्रे स्वीकारली.

अलिबाग -: तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अचानक बदली करण्यात आली. यानंतरही त्या जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नाला लागल्या होत्या. तशी चर्चा प्रशासनातही होती. मात्र आता कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर यातील स्पर्धा संपली.जिल्हाधिकारी पद सांभाळताना निधी चौधरी यांचे स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद हेते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी चौधरी यांचे अनेकदा खटके उडाले होते. नियोजन मंडळाच्या निधी वाटपाच्या मुद्यावर पालकमंत्र्यांचे त्यांच्याशी चक्क भांडण झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच्या वितुष्टानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. नव्याने डॉ. कल्याणकर याच्याकडे पदाची सूत्रे त्यांनी सोपवली. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच त्यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शास...