प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने गरीब ,गरजू मुलांना शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन ..
खोपोली-- (किशोर साळुंके ) प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या गावातील , सामाजिक कार्यात सक्रिय आसलेला सिद्धार्थ स्पोर्ट क्लब या मंडळाच्या वतीने येथील डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये विविथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सिद्धार्थनगर या गावातील शेकडो गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे प्रभाग ३ मधील विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे व्येक्तिला स्वतंत्र्य ,हक्क ,कायद्याने बहाल करणारा दिवस असून २...