कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी ) कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते. दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण...