नालंदा बुध्द विहार विहारी खोपोली येथे संविधान दिन उत्साहात साजरा संविधान दिनाचे औचित्य साधत मुलांना शालेय वस्तुंचे वाटप
खोपोली - किशोर साळुंके -- खोपोली शहरातील भारतीय बौध्द महासभा वॉर्ड शाखा विहारीच्या वतीने नालंदा बुध्द विहारात ७२ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने झाली,जेष्ठ कार्यकर्ते हरीभाऊ कदम,व कर्जत शाखेचे दगडू जाधव यांनी मार्गदर्शन केले या दिवसाचे औचित्य साधून बुध्द विहार समन्वय समिती पूणे यांचे सहकार्याने व कोमल शेलार यांचे माध्यमातून लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले स्थानिक पत्रकार किशोर साळूंके व सचिन यादव यांनी या शुभ दिनी बुध्द विहारास संविधान प्रतिमा भेट दिली. नालंदा क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने विहार प्रारंगणात संविधान प्रतीकृतीचा हुबेहूब सुंदर देखावा साखारण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन व मुंबई अतिरेकी हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून वरिल कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली.या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विहारी वाँर्ड शाखेचे विजय सताने होते, तर नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष उत्तम पवार ,सुजाता महिला मंडळाच्या लताताईं कदम या होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किर्ती सोनवणे व वैभव स...