Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

खोपोली, स्वयंपाक गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला संघटनेचा चुल पेटवून आंदोलन

        खोपोली,:  प्रतिनिधी - किशोर साळुंखे *                  *          कोरोना काळात सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक संकटात असताना केंद्र सरकारने स्वयंपाक गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेलचे दरवाढ वाढविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार  राष्ट्रवादी काँग्रेस महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या पुढाकाराने रविवार दि.27 डिसेंंबर 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला समोरील पटांगणात चुल पेटवून आंदोलन करीत केंद्र शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.         स्वयंपाक गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेल दरवाड विरोधातील आंदोलनात पालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेविका वैशाली जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर अध्यक्ष मनेष यादव,युवक अध्यक्ष अतुल पाटील,उपाध्यक्ष संजय गायकवाड,सचिव संदेश कराळे,नगरसेवक नितीन मोरे,सोहन साखरे,महिला उपाध्यक्षा जयश्री डोंगरे,सह सचिव अंजु सरकार,बुथ अ...

खोपोली पालिकेच्या शिवसेना नगरसेविका माधवी रिठे यांना मोठा दिलासा ...

    खोपोली (किशोर साळुंके ): खोपोली नगरपालिकेमधील  शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका माधवी रिठे घनकचरा संकलन व्यवस्थापन कामा साठी नेमलेल्या ठेकेदार कंपनीशी व्यावसायिक व आर्थिक संबध आसल्या बाबत खोपोली शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वाघमारे व मनोज माने यांनी खोपोली न.पा .नगरसेविका माधवी रिठे यांच्या विरुद्ध २०१७ या वर्षात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याच  तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नगरसेविका माधवी रिठे, संबधित ठेकेदाराशी सदर कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे थेठ संबध असल्याचे सांगून महाराष्ट्र नगरपालिका व औद्योगिक १९६५ ,कलम ४४ अन्वये नगरसेविका माधवी रिठे यांना अपात्र ठरविण्याचे आदेश दि. १८/१२/२०२० रोजी देण्यात आला होता. या आदेशाने खोपोली शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. तर रिठे यांनाही जबर हादरा बसला होता. वरिल विषयाची माहिती  रिठे यांना मिळताच  नगरसेविका  माधवी रिठे व त्यांचे पती लक्ष्मण ( तात्या)  रिठे  यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार  महेंद्र थोरवे यांच्याकडे धाव घेत  शिवसेनेचे व म...

कर्जफेडीने वैतागलेल्या ऍटो चालकांना नुतनीकरणाचा खर्च :खोपोली, कमाई कमी अन खर्च जास्त

 लॉकडाउन नंतर उशीरा ऍटोचालकांना व्यवसायाची परवानगी मिळाली. तोपर्यंत बॅंकांनी माफ केलेले कर्जाचे तीन हफ्ते भरण्याची वेळ आली. कोरोनाच्या भितीमुळे ग्राहक देखील ऍटोमध्ये बसण्यास घाबरत होते. त्यामुळे कमाई देखील मागील दोन महिन्यात कमीच होती. दिवाळीपासून थोडी फार ग्राहकी सुरू झाली. तोपर्यंत बॅंकांनी कर्जाचे पुर्वीचे तीन हफ्ते भरण्यासाठी तगादा सुरू केली. खासगी वित्त संस्थाचे प्रतिनिधी रस्त्यावर ऑटोचालकांना अरेरावी करण्याचे प्रकार घडले. तेव्हा हे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आले. त्यानंतर या वित्तीय संस्थांनी वसुली व वाहन वसुलीच्या नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली. आधीच थोडी फार कमाई झाल्यानंतर मागील काही महिन्यातील उधारीच्या रकमाची फेड करणे देखील आवश्‍यक झालेले होते. या त्रासातही दिवाळीपासून थोडा फार व्यवसाय सुरू झाला                        .खोपोली : कोरोना संकटात वाढीव हफ्ते व व्याजाचा भुर्दंड बसल्यानंतर ऍटोचालकांना आता नुतनीकरणाच्या खार्चिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यात कमाई कमी व देणी जास्त झाली असताना प्रशासनाने गणवेश,...

कर्जत भारतीय जनता पक्षाच्या तोल माफी आंदोलनास यश।

 भारतीय जनता पक्षाच्या तोल माफी आंदोलनास यश।  सुनिल गोगटे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी कर्जत यांचे वतीने 10 डिसेंबर रोजी कर्जतकरांना पनवेल वाशी येथे जाता येताना शेडुंग तोल नाका येथे तोल माफ करावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते। त्यास आज यश आले असून IRB तोल प्रशासनाने याप्रसंगी सकारात्मक प्रतिसाद दिला असून  कर्जतकराना फक्त 300 रुपयात मासिक पास मिळणार आहे आणि एकतर्फी प्रवासास फक्त 10 रुपये लागणार आहेत। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर चिटणीस रमेश मुंढे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर  उपस्थित होते । 

खोपोलीत तीन दिवस सूरु असलेले आलाना विरोधातील आंदोलनाला यश...

खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे ) :-  अलाना कंपनीने स्थानिक तरुणांना नोकरीत   सामावून घेण्याचे आश्वासन दिल्याने तीसर्या दिवसांनी उपोषण मागे...                          -------------------------------- स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी १६ डिसेंबर पासून आलाना कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले साखळी उपोषण ग्रामपंचायत हद्दीतील १० स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यायचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मागे घेण्यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उपोषणाला भेट देवून रुद्रावतार धारण करत आक्रमक पवित्रा घेतल्याने व्यवस्थापनाने नमती भूमिका घेवून १० जणांना तात्काळ नोकरी देण्याचे मान्य केले. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला साहेब, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील साहेब, जेष्ठ पत्रकार , संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे यांनी  या कामी मोलाची भूमिका बजावल्याने सहा वर्षांनंतर केलेल्या आंदोल...

खोपोली नगपालिकेच्या विरोधात ओसवाल कुटुंबीयांचे उपोषण

खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे )-: गेली 60  वर्षांपासून वास्तव्यास असणार्या इमारतीवर  कारवाई करत  सदर कुटुंबीयांचे  बेघर करणार्या खोपोली पालिकेच्या विरोधात 15 डिसेंबर पासून ओसवाल कुटुंबीयांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर उपोषण सूरु.....उपोषणाचा आज चा दूसरा दिवस ... शहरातील विविथ राजकिय संघटणा व व्यापारी संघटनेचा उपोषणकर्त्या कुटुंबीयांना  पाठींबा देत आज दूपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली.. ओसवाल परिवारास  न्याय न मिळाल्यास संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा  व्यापार्यांनी घेतला निर्णय ....सर्वसामांन्यांच्या  न्यायहक्कासाठी लढणारे   खोपोली नगरपालिकेचे विद्यमान  नगरसेवक किशोर पानसरे , खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती  समीर मसुरकर , सेक्रेटरी रा.काँ.पा.खोपोली व न्यु. अभिजित मित्रमंडळ अध्यक्ष सत्यजीत देशमुख  यांनी आज सकाळी नऊच्या दरम्यान उपोषणकर्त्यांना दिली भेट....सदर इमारतीचा विषय न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने भर पावसात  इमारतीवर क...

खोपोली नगपालिकेच्या विरोधात ओसवाल कुटुंबीयांचे उपोषण..

 खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे ):-   गेली 60  वर्षांपासून वास्तव्यास असणार्या इमारतीवर  कारवाई करत  सदर कुटुंबीयांचे  बेघर करणार्या खोपोली पालिकेच्या विरोधात 15 डिसेंबर पासून ओसवाल कुटुंबीयांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर उपोषण सूरु.....उपोषणाचा आजचा दूसरा दिवस ... शहरातील विविथ राजकिय संघटणा व व्यापारी संघटनेचा उपोषणकर्त्या कुटुंबीयांना  पाठींबा देत..... आज दूपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ..... उपोषणकर्त्यांना न्याय न मिळाल्यास संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद करण्याचा व्यापार्यांनी घेतला निर्णय ....सर्वसामांन्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे   खोपोली नगरपालिकेचे विद्यमान  नगरसेवक किशोर पानसरे ,सेक्रेटरी रा.काँ.पा.खोपोली व न्यु. अभिजित मित्रमंडळ अध्यक्ष सत्यजीत देशमुख  यांनी आज सकाळी नऊच्या दरम्यान उपोषणकर्त्यांना दिली भेट....सदर इमारतीचा विषय न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने भर पावसात  इमारतीवर कारवाई केल्याने बेघर झालेल्या चंदनमल मेनमल ओसवाल यांनी आपल्या टुटुंबीयां समवेत खोपोली शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर पा...

खालापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयास निवेदन सादर

खोपोली (किशोर साळुंके ) - मौजे खरीवली,नंदनपाडा,गोठीवली आणि चिलठण येथील औद्योगीक  क्षेत्र टप्पा क्र.3 अधिनियम 1961  मधील कलम 32(1)ची प्रसिध्द केलेली नोटीस बेकायदेशीर आहे. शेतकरी वर्ग पेटून ऊठलाय. 👊🏻🤜🏻🤜🏻     न्याय मिळवण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास तत्पर राहू असे सर्व बाधीत (भुसंपादीत)शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.    प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकरी वर्गात भयंकर नाराजी......       खरीवली,गोठीवली,नंदनपाडा,चिलठण ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनीधी- शांताराम पाटील (खरीवली) राजू पाटील (नंदनपाडा)परशुराम पाटील(गोठीवली)किरण पाटील(खरीवली)अशोक पाटील(खरीवली)जनार्दन खरीवले(नंदनपाडा)मिलींद दाभोळकर(खरीवली)गणेश नलावडे(जांभीवली)मिनेश पाटील(खरीवली) दिगंबर पाटील(खरीवली)अजित पाटील(गोठीवली) 🌸🌸🌸मा.उपविभागीय अधिकारी कर्जत यांचेकडे निवेदन देताना

खोपोली प्रभाग क्रमांक तीनमध्ये विकासकामांचा धडाका ... नगरसेक किशोर पानसरेंचा विकासकामांचा झंझावात ..

   खोपोली (किशोर साळुंके )- खोपोली नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे यांच्या पत्नी रेखा किशोर  पानसरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून....  प्रभाग क्रमांक तीन मधील विहारी येथे चार शीट सुलभ शौचालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला..... आजही या विभागातील  अनेक   नागरिकांच्या घरामध्ये सुलभ शौचालय नसल्याने येथील नागरीकांची वर्षानूवर्ष होणारी अडचण  नगरसेवक पानसारेंच्या प्रयत्नांनी दूर होणार असून ,.....  याकामी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करुन  देत प्रभागात  पानसरें यांनी सूरुच ठेवलाय विकासाकामांचा झंझावात ...... येथील अनेक  नागरिकांना भेडसावणार्या महत्वाचे  शौचालयाचे काम मार्गि लावल्याबद्दल किशोर पानसारे यांचे येथील नागरिकांनी आभार मानले....... यावेळी बी.आर.एस.पीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते,विहारी गावातील व या प्रभागातील असंख्य नागरिकांसह ठेकेदार भरत वाघूले उपस्थितीत होते. ....................................

सिद्धार्थनगर मध्ये ओपन जिमचे उदघाटन ................. नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नानी सदर प्रकल्प पूर्ण ........,.... भक्ती गुरु साठीलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन केले उदघाटन

( सचिन यादव  ):खोपोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 3 मधिल सिद्धार्थ नगर येथे आज ओपन जिमचे उदघाटन झाले. नगर सेवक किशोर पानसरे यांनी प्रयत्न करून सदर प्रस्ताव मंजूर करून ओपन जिम सर्व सिद्धार्थ नगर वासियांना आज खुली करण्यात आली.     आज अपघात ग्रसतांच्या मदतीसाठी असणाऱ्या संस्थेचे गुरु साठीलकर यांची कन्या भक्ती साठीलकर हिच्या वाढदिवसाचा दुग्ध शरकरा योग जुळवत सदर जिम चे उदघाटन करण्यात आले...     या समयी सिद्धार्थ नगर मधिल ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.... .. (..1/12/2020.. खोपोली )