गांधीजी यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापेक्षाही चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानवतेला जिवंत ठेवणारा सत्याग्रह .. भाईसाहेब जाधव
खोपोली ( किशोर साळुंके ) महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी माहाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती घडवून आणली. महाडच्या त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त २० मार्च २०२२ रोजी चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिना निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्सा संखेत आंबेडकर अनुयायी महाडमधे दाखल झाले होते. .सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर चवदार परिसरातील क्रांती भूमीत हजारोच्सा संखेने भीम अनुयायी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दरी संपुष्टात यावी यासाठी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन देशात सामाजिक क्रांती घडवून आणली होती. चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी तमाम भिम सैनिक , भिम प्रेमी, विविध सामाजिक संघटणा , शासकीय आधिकारी, राजकीय पुढारी उपस्थितीत राहून चवदार तळ्यातील पाणी प्राशन करुन तळ्यातील पाण्याला स्पर्श करुन चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला यावेळी उजाळा दिला. बहुजनांच्या प्रश्नांबाबत तडजोड न करता प्रामाणिकपणे ...