Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा...

खोपोली पोलीस ठाण्यात बॅडमिंटन हॉल चे उदघाटन संपन्न

खोपोली :(किशोर साळुंके) : खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत उभारण्यात आलेल्या शाहिद श्री. अशोक कामटे बॅडमिंटन हॉल चे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस कर्मचारी सतत कामात गर्क असल्याने त्यांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ही बाब लक्षात घेऊन खोपोली पोलीस ठाण्याच्या आवारात बॅडमिंटन हॉल उभारण्यात आले व त्यास शहीद श्री अशोक कामटे बॅडमिंटन हॉल नाव देऊन त्यांच्या बलिदानास सन्मानित करण्यात आले. आज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , डीवायएसपी खालापूर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यासमयी पोलिसांच्या नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

तुपगावच्या रेशन दुकानात होणारा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा -सुशील भाई जाधव

खोपोली -(किशोर साळुंके)- खालापूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तुपागाव येथिल रेशन दुकानात मोठा भ्रष्टाचार होत असून पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी त्याची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी बहुजन युथ पँथर चे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली आहे. खालापूरातील तुपागाव येथे सुरेख जितेंद्र पांडे यांचे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात आहे. अनेक वर्षांपासून या दुकानदाराकडून धाण्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक करीत असून त्या बाबतची लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार, खालापूर पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे बहुजन युथ पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जण आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत पिंपरी-चिंचवड मधील अनाधिकृत बांधकांवरील कारवाई तुर्तास थांबवा.*पिंपरी-चिंचवडम महापालिका आयुक्त राजेश पटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी...*

. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी . पिंपरी - चिंचवड -- कोरोना आणि लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे हाल झाले आहेत. अनाधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने १००० चौरस फूटपर्यंत बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यामुळे १ हजार चौरस फुटापर्यंतची अनियमित बांधकामांवर प्रशासनाला कारवाई करता येणार नाही. तसेच, अनाधिकृत बांधकामांबाबत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत अनाधिकृत बांधकाम कारवाई करु नये अशी मागणी शिवशाही व्यापरी संघाचे संस्थापक , अध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेला निवेदनाद्वारे केली .

. प्राची भोईर हिने कुस्तीत रायगड जिल्ह्याची मान उंचावली. राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक.

खोपोली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, एन. बी. ग्रुप व निकाळजे ग्रुप पुरस्कृत, विकास ग्रुप यांच्या विशेष सहकार्याने 23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 ही सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटांमध्ये कु. प्राची भोईर या कुस्तीपटूने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल - खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.प्राची कुस्तीचा सराव करते. या स्पर्धेमध्ये सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे येथील कुस्तीपटुंचे वर्चस्व असताना कु. प्राची भोईरने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कु. प्राचीने मिळविलेले पदक ही त्याची नांदी आहे. त्यामुळे तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार बाळाराम पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्...

स्वप्निल जाधव यांची नियुक्ती .. शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी स्वप्नील अनिल जाधव यांची निवड जाहीर.

खोपोली प्रतिनिधी-शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन अण्णा लिमकर यांच्या सुचनेने व चिंचवड विधानसभा अध्यक्ष धनराज दाखले यांच्या अनुमोदनाने *स्वप्नील अनिल जाधव* यांची पिंपरी चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी निवड मुंबईमधून संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज जाहीर केली. नवनियुक्त ग प्रभाग अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमधील व्यापारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक,दिव्यांग बांधव, बांधकाम मजूर बांधव यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

किशोर पानसरे ..विकासाचे वारे.....किशोर पानसरे यांच्या पूढाकारातून प्रकाशनगरमधे ओपन जिमचा उद्धघाटन.सोहळा संप्पन्न...

किशोर पानसरे ..विकासाचे वारे.. खोपोली - (किशोर साळुंके ) खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक तिन मधील प्रकाशनगर येथे या प्रभागातील विकास पुरुष समजले जाणारे किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून या प्रभागातील विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून ओपन जिमचा उद्धघाटन सोहळा संप्पन्न झाला. कोरोना या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग थांबले होते .या आजाराने अनेकांचे बळी घेतले,यावेळी ज्यांचे शरीर निरोगी व सुदृढ होते अशा लोकांना या आजारावर मात करता आली. उत्तम शरीर असेल तर मन सुद्धा उत्तम राहील तसेच विविध आजारांवर मत करण्यासाठी आज व्यायाम करणे हि काळाजी गरज ओळखून पानसरे यांच्या प्रयत्नातून प्रभाग तिनमधे ओपन जिम सूरु करण्यात आली.या प्रभागातील विविध गावांमधे नागरीकांच्या आरोग्याचा विचार करत प्रभाग तिनमधे पानसरे यांनी एकून पाच ते सहा ओपन जिम सूरु केल्यामुळे पानसरे यांचे या विभागातील नागरिकांकडून कौतूक होत आहे. नगरसेवक पानसरे यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत प्रभाग तिनमधे यांनी अनेक भरीव विकासकामे मार्गी लावून येथील नागरीकांची मने जिंकली असल्याने तसेच नगरसेवक या पदाची काही महीने शिल्लक असताना सु...

छत्रपती संभाजी महाराज यांचे पळसदरी मठात जंगी स्वागत

कर्जत -(संकेत घेवारे ) - संपूर्ण भारतातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठा बांधवानी एकत्र येण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सुरु केलेल्या जनसंपर्क यात्रेचे जंगी स्वागत पळसदरी येथे करण्यात आले. सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण देशातच नव्हे तर परराष्ट्रातील मराठ्यांनी आंदोलने केली. शेकडो मोर्चे निघाले, अनेकांनी आत्म बलिदान केले, पण आरक्षण मिळाले नाही. पुन्हा सर्व समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी रेटून धरण्यासाठी आणि सरकारने हे आरक्षण मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी जनसंपर्क अभियान यात्रा सुरु केली असून रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे या यात्रेचे तुतारीच्या गजारात जंगी स्वागत करण्यात आले. कर्जत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात छत्रपती संभाजी महाराज यांचे मठाच्या वतीने मठाधीपती यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्र टाईम्स 25NEWS चे सह संपादक अभिजित दरेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..

सिटी बस सेवा तात्काळ सुरु करा - आरपीआय

खोपोली -(किशोर साळुंके ) : खोपोली परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी सिटी बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून सिटी बस बंद करण्यात आली होती, कोरोना आटोक्यात आल्यानंतर देखील आज पर्यंत खोपोली सिटी बस अद्याप चालू करण्यात आलेले नाही. ती सुरु करण्याची मागणीआर पी आय ने खोनपा कडे केली आहे. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रेल्वे,विमान,बस सेवा सुरू झालेले आहे तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मागणी वरून खोपोली शहर सिटी बस 15 दिवसाच्या आत चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी व शिवशाही व्यापारी संघ, तथ्य योद्धा, सामाजिक संघटना, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी समाजसेवक पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन खोपोली नगर परिषदेवर जन आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोकण प्रदेशाध्यक्ष मातंग आघाडी तुषार कांबळे यांनी खोपोली नगर परिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.

सुनिल पाटिल व वनिता काळे यांच्या प्रयत्नातून यशवंत नगर च्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

खोपोली - (किशोर साळुंके ) - खोपोली नगरीतील यशवंत नगर येथे आज खोपोली नगर पालिकेचे नगरसेवक /गटनेते सुनिल पाटिल व नगरसेविका वनिता हरिष काळे यांच्या माध्यमातून आर सी सी रस्ता व गटार यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खोपोली नगर परिषद हद्दीतील यशवंत नगर मध्ये रस्ता व गटारांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना त्रास होत होता. यामुळे स्थानिक नगरसेवक सुनिल पाटिल व वनिता हरिष काळे यांनी खोनपा मधुन सदर कामाची नव्याने निर्मिती करण्याची मंजुरी आणून आज आर सी सी रस्ता व गटार यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर समई सुनील गोटीराम पाटील ,वनिता हरिष काळे, हरिष काळे ,आनंद नायडू,मेहमूद शेख, विजय कुंडले ,जुनेद पठाण, निलेश परदेशी, सुरज परदेशी,बब्या सय्यद, शिवाजी गोसावी, रवि यादव,फिरोज सय्यद, रघुनाथ भोईर, कविता नायडू ,रत्नप्रभा सोनवणे, काशी मकदुम शेख, कांता गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उत्तम स्टील - डोणवत* कंपनीच्या कामगारांनी पुकारला संप.

खालापूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी *उत्तम स्टील - डोणवत* ह्या कंपनीतील कामगार आज पासून काम बंद आंदोलन करून संपावर गेले आहेत. गेली अनेक वर्षे *उत्तम स्टील - डोणवत* व्यवस्थापनाने कर्मचारी आणि कामगारांना संयुक्तिक पगारवाढ न दिल्याने नाराजी होती. कंपनी व्यवस्थापनाला वारंवार सूचना आणि विनंती करूनही कोणता फरक न पडल्याने आता हे सर्वांनी संपाचे हत्यार उचलल्याचे समजते. *उत्तम स्टील - डोणवत* येथे काम करणारे कायमस्वरूपी साधारपणे तीनशे पेक्षा जास्त कामगार आणि कर्मचारी तसेच इतर कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवत आहेत असे चित्र आज सकाळपासून दिसत आहे.

सुवर्णा मोरें व संतोष मोरे यांच्या प्रयत्नातून अखेर तो धोकादायक टाँवर हटविला.. मोरे यांचे येथील नागरिकांनी मानले आभार..

खोपोली -- खोपोली शहरातील सिद्धार्थनगर येथील मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक बोर्डचा चाळीस /पंन्नास वर्षांपूर्वीपासूनचा उच्च विद्युत दाबाचा टाँवर जीर्ण झाला होता. भविष्यात कोसळून या ठीकाणी मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होवू शकत होती.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर महीला अध्यक्षा सौ सुवर्णा संतोष मोरे व शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष उर्फ बंटी मोरे यांनी संबधित खात्याकडे लेखी तक्रार करुन अनेक महीन्यांनपासून पाठपूरावा केल्यामुळे सदर खात्याच्या विभागाने दखल घेत तो धोकादायक टाँवर अखेर हटविला. सिद्धार्थनगरमधे नागरीवस्तीच्या अगदी मधोमध उच्च विद्युत वाहक टाँवर गेले चाळीस ते पंन्नास वर्षांपासून उभा होता.तो जीर्ण झाल्याने कधीही कोसळू शकत होता .सदर टाँवर बरोबर एकाच रेषेत असणार्या टाँवर पैकी विहारी बुद्ध विहारा समोरील पटांगणात असणारा टाँवर मगील चक्रीवादळात कोसळला होता.त्यामुळे सिद्धार्थनगर मधील टाँवर कधीही कोसळू शकतो अशी भिती सिद्धार्थनगर येथील रहीवासीयांन मध्ये निर्माण होवून या ठिकाणी भितीचे वातावरण निर्माण झाल्याने टाँवर शेजारील अनेक नागरिकांनी आ...

बहुजन युथ पँथर च्या खोपोली शहर अध्यक्षपदी किशोर साळुंके यांची नियुक्ती

खोपोली - (प्रतिनिधी ) : संपूर्ण महाराष्ट्रात अन्याया विरोधात आवाज उठविणारी लढाऊ असणाऱ्या बहुजन युथ पँथर या संघटनेच्या खोपोली शहर अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी किशोर साळुंके यांची नियुक्ती केली. संपूर्ण महाराष्ट्रभरात कोणावरही अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देणे, विविध आंदोलन करून वेळेला रस्त्यावर उतरून सामाजिक समस्या सोडविणासाठी भाईसाहेब जाधव यांनी बहुजन युथ पँथर ही लढाऊ संघटना स्थापन केली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सुशीलभाई जाधव यांनी स्वीकारल्यावर काम करून दाखविले. संघटना वाढीसाठी अथक परिश्रम घेतले. आज खोपोली शहरात नागरिकारण वाढत आहे. इथेही अनेक सामाजिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी खोपोली नगरीत ही संघटना कार्यरीत झाली असून खोपोली मधिल सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकारितेतून सामाजिक प्रश्न सोडविण्यात भर देणारे किशोर साळुंके यांची खोपोली शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. छोटेखानी सभेत बहुजन युथ पँथर चे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव या...

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त...

सुवर्ण मोरे यांच्या माध्यमातून सिद्धार्थनगर मध्ये कोजागिरी पौर्णिमा संपन्न

खोपोली -(किशोर साळुंके): खोपोली नगरीतील सिद्धार्थनगर मध्ये सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा संपन्न झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे यांच्या माध्यमातून संगीत खुर्ची, टाळीगरबा याचे आयोजन केले होते. दरवर्षी सिद्धार्थनगर मधिल ग्रामस्थ मोठया उत्साहात साजरा करतात. याही वर्षी हा सण साजरा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे यांनी स्पर्धात्मक नियोजन करून लहान मुले, तरुणी व महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करून विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. यानंतर टाळीगरबा खेळून पारंपारिक पद्धतीने चंद्र दर्शन घेऊन दुध वितरित करण्यात आले.

टेम्पोला आग लावून मृतदेह जाळला खून लपवण्यासाठी लढवली शक्कल. पोलिसांनी शातिर खुन्याला साथीदारांसह शिताफीने पकडले

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे कडील लेनवर 12 ऑक्टोबरच्या 2021क्या मध्यरात्री एक मालवाहू टेम्पोला आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या तपासाअंती भयानक सत्य बाहेर आले असून तो व्यक्ती टेम्पोच्या आगीत जळाला नव्हता तर त्याला क्रूरपणे जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. अतिशय योजनाबद्धरित्या एखाद्या सिनेमात शोभवी अशी शक्कल या गुन्ह्यात गुन्हेगारांनी वापरली होती. मात्र रसायनीचा पोलिस यंत्रणेने सुतावरून स्वर्ग गाठत जळीतकांडाचा यशस्वी तपास करून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत मात्र यातील अजुन एक जण फरार असुन त्याचा शोध घेतला जातोय. सदर खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याचे समजते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला आग लागली होती. आगीची माहीत मिळताच पोलिसांसह आय आर बी ची पेट्रोलिंग टीम, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम तेथे पोहचल्या होत्या. आग ...

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी जाहीर..

खोपोली --(किशोर साळुंके ) जनसामान्यांच्या न्याय हक्कसाठी आहोरात्र झटणारे उद्देश गणेश शेंडगे यांची शिवशाही व्यापारी संघ वडाळा विधानसभा अध्यक्ष पदी संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी शेकडो कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती केली. नवनिर्वाचित मुंबई वडाळा विधानसभा अध्यक्ष उद्देश शेंडगे यांनी सर्वसामान्य व्यापारी वर्गाच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी शिवशाही व्यापारी संघ मुंबई अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी शेंडगे यांना देऊन पुढील सामाजिक कार्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या...

खोनपा दवाखान्यात गेली दोन दिवसांपासून एका खाजगी रुग्णवाहिकेत दोन मृत व्येक्तिंचे शव .प्रचंड दुर्गंधी ... महाराष्ट्र टाईम्स 25 न्युजने घेतली दखल ... .

खोपोली..(किशोर साळुंके )) काल खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या मुंबई - पुणे महामार्गावर झालेल्याअपघातात अमरवती येथील दोन सख्या भावांचा छिन्नविछिन्न प्रकारे अपघतात होवून जागीच मृत्यु झाला.सुरेश लक्ष्मण गडलिंग ..वय ४६ संतोष लक्ष्मण गडलिंग वय ४३ अशी मृतांची नावे आहेत ..खोपोली पोलीस ठाण्यात गु. र,न. ३३६ नूसार नोंद झाली असून, वरिल दोघांचे शव खोपोली शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गेली दोन्ही अपघातग्रस्तांचे शव एका खाजगी शववाहिकेत /रुग्णवाहिकेत पालिकेतील डाँ,बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणून नोंद करण्यात आली.काही कारणास्तव दोघांचे मृत्यदेह दोन दिवस नेण्यात आले नव्हते.आज दि, १५ आँक्टोबर सायंकाळी ०७ वाजता वरिल रुग्णालयाच्या परिससरात दोन्हीही मृतदेहांमुळे दूर्गंधी पसरल्याचे महाराष्ट्र टाईम्स 25 न्युजच्या टीमला खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय म्हात्रे,पत्रकार अंकुश मोरे,...संतोष मोरे ..या जागृत खोपोलीकरांनी एकत्र येवून , खोपोली पोलीसांकडे संपर्क करताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत दोन्ही मृतदेह...

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टेम्पोला आग एकाचा होरपळून मृत्यू

खोपोली :-मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर किलोमीटर 18.900 वर गाडीला भीषण आग लागली. या अपघातात जळलेली गाडी साधारण 12 वाजताच्या दरम्यान 18.900 किलोमीटरला पुणे लेनवर शोल्डरला उभी होती. नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या आय आर बी च्या टीमने तेथे उतरून पाहणी केली. त्यावेळीं गाडीत कोणी आढळले नाही. त्यांनी सेफ्टी कोन लावले, गाडीची नोंद घेतली आणि ते पूढे निघून गेले. मात्र काही वेळानंतर त्याच गाडीला आग लागल्याचे समजले. लागलीच फायर ब्रिगेड खोपोलीची टीम घटनास्थळी दाखल झाली, देवदूत यंत्रणे सोबत सिडको, रिलायन्स आणि आय आर बी च्या फायर ब्रिगेडने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात विविध पप्रकारच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिकल साहित्य खच्चुन भरले होते. बऱ्याच प्रयत्नांती आग नियंत्रणात आलेली असताना केबिन मधे एक मृतदेह पुर्ण जळलेल्या स्थितीत दिसून आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरूनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी यात मदत केली. मृतदेह बाहेर काढून चौक रुग्णालयात शविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. पळस्पे वाहतूक पोलीस, रसायनी बनपोलीस स्टेशन, लोकमान्य हॉस्...

रायगड भूषण जगदीश मरागजे यांच्या हस्ते वडवळ ग्रामपंचायतीच्या पथदिप योजनेचे भूमिपूजन

खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंके ) खालापूर तालुक्यातील वडवळ गावचे सुपुत्र तथा रायगड भूषण जगदीश मरागजे यांच्या हस्ते वडवळ ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले. वडवळ ग्रामपंचायत क्षेत्रात येणार्‍या वासोटे, ताकवली, कुसावडे, कसबे तांबी, धवली अशा एकूण पाच गावांचे रस्ते प्रकाशमान करण्याच्या उद्दीष्टाने ही योजना राबवली जाणार आहे. वडवळ ग्रामपंचायतीने भूमिपूजनाच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या छोटेखानी समारंभात जगदीश मरागजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या कोयना धरणाच्या निर्मिती दरम्यान या परीसरात पुनर्वसित झालेल्या कोयना वसाहतीत 1959 नंतर पहिल्यांदाच असा प्रकल्प दृष्टिपथात येणार आहे. या कार्यक्रमात माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, अशोक मरागजे, महेंद्र सावंत, अनिल सावंत, श्रीकांत मरागजे, योगेश शिंदे, श्याम सावंत, विलास सावंत, मुख्याध्यापक सुधाकर थळे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाघमारे, उपसरपंच श्वेता कुंभार, सदस्य स्नेहा मरागजे, रमेश गायकवाड, गायत्री सावंत, सुवर्णा शिंदे, सरस्‍वती सावंत,...