खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली पोलीस ठाण्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, या वर्षीपासून पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विविध मुद्द्यांवर स्पर्धा सुरू करण्यात आली होती व या स्पर्धेच्या विजेत्यांना “विघ्नहर्ता पुरस्कार” सोहळा खोपोली शहरातील गगनगिरी महाराज यांच्या लगत असलेले कँम्पोलियन रिसाँर्ट येथे वरिल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासोबतच पोलीस ठाणे आवारात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र विश्रामगृहाच्या इमारतीच्या वास्तुची पायाभरणी समारंभ पार पाडण्यात आला. 2021 या पारितोषिक वितरण सोहळ्यात रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे,खालापूर तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला ,खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल ,खोपोली पोलीस निरिक्षक शिरीष पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली शहरासाठी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीला, सहज सेवा फाउंडेशन, खोपोली अॅक्ट, अल्टा लॅबोरेटरीज या ध्येयवेड्या वरिल चार सामाजिक संस्थांना ...